शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

पुण्याच्या स्मिता घुगेने लडाखच्या खरदुंगला पास येथे फडकवला ७५ फुटी तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 10:43 IST

महाराष्ट्रातील तमाम जनतेचा पाठिंबा आणि माझ्या कुटुंबाची साथ मिळाल्यामुळे मी हे यश मिळवू शकले

पांडुरंग मरगजे.

धनकवडी : देशाचे अमृत महोत्सवी वर्ष हे भारतीय युवकांच्या स्वप्नपूर्तीचे वर्ष ठरले. धनकवडी येथील गिर्यारोहक स्मिता घुगेने राष्ट्रकुलला शोभेल अशी कामगिरी करत लडाखमधील 'खरदुंगला पास' येथे १७,९८२ फूट उंचीवर ७५ फूटी तिरंगा फडकवून आगळा विक्रम केला. ३६० एक्सप्लोररचे गिर्यारोहक आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मिता हीने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सोबत घेऊन तिरांगा फडकावला; इतकेच नाही तर या अतिउंच ठिकाणी भारतीय राज्य घटनेच्या प्रस्ताविकेचे वाचन केले. धनकवडीच्या गिर्यारोहक स्मिता दुर्गादास घुगे हिने १५ ऑगस्ट २०२२ रोजी  सकाळी सहा वाजता जम्मू आणि काश्मीरच्या लडाख जिल्ह्यातील खरदुंगला पास या १७,९८२ फूट उंचीच्या  जगातील सर्वात उंच मोटरेबल पासवर ७५ फुटी तिरंगा फडकवला. ही कामगिरी बजावताना स्मिता हिने आपल्यासोबत महाराष्ट्राचे स्फुर्तीदैवत शिवरायांची मूर्ती सोबत नेली होती. या मूर्तीच्या साक्षीने तीने तिरंगा फडकवला; तसेच भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेचे वाचन करत खरदुंगला पास येथे अत्यंत आगळ्या पद्धतीने भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा केला.

या मोहिमेदरम्यान ३६० एक्सप्लोररतर्फे ७ ते १५ ऑगस्ट दरम्यान स्मिता घुगे हिने भारत पाकिस्तान सीमारेषेवरील टिठवाल, कारगिल मेमोरियल, पोंगोन लेक इथेसुद्धा ७५ फूटी तिरंगा ध्वज फडकवला. गिर्यारोहक स्मिता घुगे हिने याआधी आफ्रिकेतील टांझानिया देशातील किलीमांजारो शिखरावर तसेच शिवजयंती उत्सवाच्या दिवशी १९ फेब्रुवारी २०२२ रोजी एव्हरेस्ट बेस कँप लोबुचे येथे ७५ फुटी तिरंगा फडकवण्याचा पराक्रम केला होता.

"देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खरदुंगला पास येथे ७५ फुटी तिरंगा फडकवण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता. अत्यंत प्रतिकूल वातावरणाला तोंड देत मी हे साध्य करू शकले कारण शिवरायांची प्रेरणा माझ्या मनात सदैव जागृत होती. मार्गदर्शक आनंद बनसोडे व महाराष्ट्रातील तमाम जनतेचा पाठिंबा आणि माझ्या कुटुंबाची साथ मिळाल्यामुळे मी हे यश मिळवू शकले. माझे हे यश मी महाराजांना समर्पित करत असल्याची भावना घुगे हिने व्यक्त केली आहे.'' 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनDhankawadiधनकवडीWomenमहिलाIndiaभारतladakhलडाख