शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

स्मार्ट वीज चोरीची चाके फिरतात गरागर  :  महावितरणसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 06:00 IST

घरगुती अथवा औद्योगिक वीजचोरीसाठी चोरट्यांकडून पुर्वी विद्युत तारांवर आकडे टाकण्याची पद्धत सर्रास वापरली जात होती.

ठळक मुद्देनवनवीन प्रकारामुळे मीटरमध्येही करावा लागतो बदल जवळपास ५० हून अधिक प्रकारे वीज चोरी

पुणे : विद्युत तारांवर आकडा टाकून विजेची चोरी केली जात असल्याचे अनेकांना माहीत आहे. मात्र, विद्युत मीटरशी छेडछाड करुन किमान पन्नास पद्धतीने मीटरमध्ये फेरफार करुन वीज चोरी केली जात आहे. त्यामुळे विद्युत मीटर अधिक सुरक्षित करण्याचे आव्हान महावितरणसमोर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घरगुती अथवा औद्योगिक वीजचोरीसाठी चोरट्यांकडून पुर्वी विद्युत तारांवर आकडे टाकण्याची पद्धत सर्रास वापरली जात होती. ग्रामीण भागात आजही असे प्रकार दिसून येतात. शहरातील बहुतांश विद्युत वाहिन्या या भूमीगत झाल्याने शहरी भागात हा प्रकार तुलनेने कमी झालेला दिसतो. पुर्वी, मीटरमधील चकती लोखंडाची होती. तेव्हा ती लोहचुंबक लावून चकतीचे फिरणे थांबविले जायचे. पुढे चकतीसाठी लोखंडाचा वार बंद झाला. तसेच, मीटरही डिजिटल आकड्यांचे झाले. मीटर आधुनिक झाली, तशी त्या प्रमाणे चोरही अनेक क्लृप्त्या लढवून विद्युत चोरीचे नवीन मार्ग शोधत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते वाजित खान यांनी भवानी पेठेतील एका उपविभागाची माहिती मिळविली. या लहानशा भागामध्ये २०१२ पासून फेब्रुवारी २०१९ या कालावधीत १७२ विद्युत चोऱ्या उघड झाल्या. त्यातून ७२ लाख ३६ हजार रुपयांची वीज चोरी पकडली गेली. पुणे शहरामध्ये पद्मावती, पर्वती, रास्तापेठ, बंडगार्डन, अहमदनगर रस्ता, शिवाजीनगर आणि कोथरुड विभाग येतात. त्यामुळे विजचोरीची हा आकडा कितीतरी अधिक असल्याचे स्पष्ट होते. मीटर अ‍ॅसिड टाकून खराब करणे, मीटर गरम पाण्यात टाकून पुन्हा बसविणे, मीटरच्या यंत्रणेत फेरफार करुन वीज चोरी करणे अशा अनेक प्रकारे विज चोरी होत आहे. याबाबत माहिती देताना महावितरणच्या दक्षता विभागाचे प्रमुख शिवाजी इंदलकर म्हणाले, विद्युत चोरी हा प्रकार उंदीर मांजराचा खेळ आहे. महावितरण जितक्या सुधारणा करेल, तितक्या वेगवेगळ्या पद्धतीने वीजचोर नवीन प्रकारे वीज चोरी करीत आहेत. जवळपास ५० हून अधिक प्रकारे वीज चोरी केली जात आहे. मीटरमध्ये फेरफार करण्यापासून, विद्युत तारांवर आकडे टाकण्याच्या पद्धतीचा त्यात समावेश होतो. चोरांच्या सर्व क्लृप्त्या जाहीर करु शकत नाही. अन्यथा तशा पद्धतीच्या चोºयांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. --------------

टॅग्स :Puneपुणेmahavitaranमहावितरण