राष्ट्रवादीकडूनच खराडीचा स्मार्ट विकास
By Admin | Updated: February 17, 2017 05:19 IST2017-02-17T05:19:38+5:302017-02-17T05:19:38+5:30
खराडी-चंदननगरचा महापालिकेत समावेश झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला विकास हा कुणाच्या नजरेतून लपून राहणारा नाही.

राष्ट्रवादीकडूनच खराडीचा स्मार्ट विकास
पुणे : खराडी-चंदननगरचा महापालिकेत समावेश झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला विकास हा कुणाच्या नजरेतून लपून राहणारा नाही. खराडी-चंदननगरमध्ये स्पष्ट दिसत असून तो फक्त विरोधकांनाच दिसत नसल्याने ते विकासाच्या मुद्यावर बोलण्यास टाळाटाळ करून आमच्यावर कौटुंबिक टीका करून आम्हाला बदनाम करत असल्याचा आरोप नगरसेवक महेंद्र पठारे यांनी केला. प्रभाग क्रमांक ४ मधील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार महेंद्र पठारे, संजिला पठारे, सुमनताई पठारे व माजी न्यायाधीश अॅड. भैयासाहेब जाधव यांनी खराडीतील यशवंतनगर येथील मतदारांशी बैठक घेऊन संवाद साधला. पठारे म्हणाले, की विरोधकांकडे खराडी-चंदननगर विकासाचे कसलेही व्हिजन नाही.
यशवंत चव्हाण, राहुल भाऊसाहेब पठारे, स्वप्निल रमेश पठारे, बंटी हरगुडे, अनिकेत पठारे, पप्पू गरुड, सुनील हरगुडे, मोहन साकोरे, सुभाष सुळके, अक्षय पठारे, विजय पठारे, चेतन पठारे, राहुल पठारे यांनी विकासाच्या राजकारणाला साथ द्यावी, असे सांगितले. (प्रतिनिधी)