शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’ची सायकल ५ डिसेंबरला रस्त्यावर; महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 16:41 IST

स्मार्ट सिटी कंपनीच्या सायकल शेअरिंग योजनेला ५ डिसेंबरला (मंगळवार) सकाळी साडेदहा वाजता महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सुरूवात होत आहे.

ठळक मुद्देकंपनीच्या औंध-बाणेर-बालेवाडी या विशेष क्षेत्रापुरतीच राबवण्यात येणार योजना सायकल वापरासाठी अ‍ॅप्लिकेशन घ्यावे लागेल, नावाची नोंद झाली की वापरता येईल सायकल

पुणे : स्मार्ट सिटी कंपनीच्या सायकल शेअरिंग योजनेला ५ डिसेंबरला (मंगळवार) सकाळी साडेदहा वाजता महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सुरूवात होत आहे. कंपनीच्या औंध-बाणेर-बालेवाडी या विशेष क्षेत्रापुरतीच ही योजना राबवण्यात येत असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही ही योजना राबवण्यात येणार आहे.पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी ही माहिती दिली. जगातील बहुतेक मोठ्या शहरांमध्ये आता पर्यावरण संवर्धन तसेच व्यायाम यासाठी सायकल चालवण्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच ही योजना पथदर्शी स्वरूपात राबवण्यात येत आहे. एका कंपनीने त्याची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे त्या कंपनीला तीन महिन्यांसाठी त्यांच्या सायकलींसह हा प्रकल्प ट्रायल बेसिसवर राबवण्यास सांगण्यात आले आहे. वाहतूक शाखा, महापालिका यांची यासाठी विशेष परवानगी घेण्यात आली आहे.सायकल कंपनीचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते. ३०० सायकली स्मार्ट सिटीच्या विशेष क्षेत्रात वापरता येतील. या सर्व सायकली अत्याधुनिक आहेत. सायकल वापरासाठी एक अ‍ॅप्लिकेशन मोबाईलवर घ्यावे लागेल. नावाची नोंद झाली की मग सायकल वापरता येईल. तीची लॉकिंग सिस्टिमही अत्याधुनिक आहे. सायकल वापराचा पहिला अर्धा तास किरकोळ शुल्क असेल. त्यानंतरच्या प्रत्येक तासासाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाईल. सायकल कुठेही सोडली तरी तिच्यावर असलेल्या जीपीएस सिस्टीममुळे ती कुठे आहे ते लगेच समजेल. कंपनीचे प्रतिनिधी ती जमा करून घेतील किंवा तिथल्यास दुसऱ्या वापरकर्त्याला देतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.स्मार्ट सिटी कंपनीने विशेष क्षेत्रात सध्या दीड किलोमीटर अंतराचा पादचारी मार्ग विकसीत केला आहे. तिथेच सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. त्याशिवाय विशेष क्षेत्रात आणखी काही किलोमीटर अंतराचे सायकल ट्रॅक तयार करण्यात येत आहेत. प्रदुषण कमी करण्याचा हा अत्यंत चांगला उपाय आहे. त्यामुळे पुणे महापालिकाही ही योजना राबवत असेल तर त्यांना स्मार्ट सिटी कंपनीचे सहकार्य असेल असे जगताप म्हणाले. सायकलचा वापर वाढाला, जवळच्या कामांसाठी सायकल वापरता येणे शक्य  आहे असे जगताप म्हणाले.महापालिका संपूर्ण पुणे शहरात ही योजना राबवणार असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. स्मार्ट सिटी कंपनीचा हा प्रकल्प आदर्श व पथदर्शी असेल असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. सायकलींचे शहर ही एकेकाळी पुण्याची ओळख होती. मधल्या काळात ती ओळख पुसून गेली. पर्यावरण संवर्धनासाठी त्याचा चांगला उपयोग होईल व पुण्याला पुन्हा जूनी ओळख मिळेल असे जगताप म्हणाले. महापौरांच्या हस्ते येत्या मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठात या योजनेची सुरूवात करण्यात येणार आहे.

 

सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा परिसर बराच मोठा आहे. सततच्या वाहनांच्या गर्दी व धुरामुळे तो प्रदुषित होत चालला आहे. त्यासाठीच विद्यापीठाला ‘नो व्हेईकल झोन’चा प्रस्ताव दिला आहे. यात विद्यापीठात एकही स्वयंचलित वाहन आणायचे नाही, अंतर्गत सर्व परिसर सर्वांनीच फक्त सायकलवर फिरायचा असा विचार आहे. प्राथमिक चर्चा झाली आहे, मान्यता मिळाल्यास हा प्रकल्प तिथे राबवू.- राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी कंपनी

टॅग्स :Puneपुणे