काळेवाडीत वाळूउपसा करणारी बोट जाळली

By Admin | Updated: January 10, 2015 22:55 IST2015-01-10T22:55:14+5:302015-01-10T22:55:14+5:30

बेकायदा वाळूउपसा करणाऱ्यावर बोटीवर धाड टाकुन ती जळण्यात आली़ तहसीलदार राम चोबे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली़

Slow-siding boat was burnt in Kalewadi | काळेवाडीत वाळूउपसा करणारी बोट जाळली

काळेवाडीत वाळूउपसा करणारी बोट जाळली

भोर : तालुक्यातील गुंजवणी व नीरा नदीच्या संगमावर काळेवाडी गावाच्या हद्दीत बेकायदा वाळूउपसा करणाऱ्यावर बोटीवर धाड टाकुन ती जळण्यात आली़ तहसीलदार राम चोबे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली़ भोर तालुक्यात बोटीच्या साह्याने वाळूउपसा करण्याची ही पहिलीच घटना आहे
या बोटीचे मालक महादेव हरिदास तनपुरे, अमित संजय तनपुरे, संतोष नामदेव तनपुरे (सर्व रा़ धांगवडी, ता. भोर) यांची संशयित म्हणून नावे पुढे येत असल्याचे तहसीलदार राम चोबे यांनी सांगितले
काळेवाडी गावाजवळ नीरा नदी पात्रात बोटीद्वारे बेकायदेशीर वाळूउपसा सुरु असल्याचा फोन काल रात्री १०.३० वाजता तहसीलदारांना आला़ त्यानंतर ७ तलाठी व दोन पोलिसांच्या मदतीने रात्री १२ वाजता हे पथक त्या ठिकाणी गेले़ मात्र त्यांना बोट दिसली नाही़ सुमारे एक तासाने शोधानंतर झुडपात लपवलेली बोट दिसली़, मात्र बोटीत कोणीही नव्हते़ त्यामुळे पथकाने डिझेल टाकुन ही बोट पेटवुन कारवाई करण्यात आली.

४ यापूर्वी २८ डिसेंबरला रात्री बोटीने वाळु उपसा सुरु असल्याचा फोन आला होता़ त्यावेळी पथकाने बोटीवरचे पाईप मोडुन बोट जप्त करुन ती नदीच्या काठाला आणुन
ठेवली होती तहसिलदारांनी त्यांना विचारल्यावर उडवा
उडवीची उत्तरे दिल्यावर
त्यांना एक लाख रुपये दंड भरण्यास सांगितले होते.

Web Title: Slow-siding boat was burnt in Kalewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.