शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर तालुक्याची सुत्रे चुकीच्या माणसाच्या हातात गेली- हर्षवर्धन पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 16:02 IST

मग आम्ही सुद्धा कारखान्याच्यावतीने सहकार्य करू....: हर्षवर्धन पाटील

बारामती:इंदापूर तालुक्याचा १९५२ पासून ते २०१४ पर्यंतचा इतिहास काढून पाहिला तर राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता इंदापूर तालुक्यामध्ये होती. मात्र दुदैर्वाने चुकीच्या माणसाच्या हातामध्ये इंदापूर तालुक्याची सूत्र गेल्यामुळे आज आपली अवस्था अशी झाली आहे, अशा शब्दात माजीमंत्री हर्षवर्धन पाटील (harshvardhan patil) यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर हल्लाबोल केला.

इंदापूर येथील वीज वितरण कार्यालयाच्या समोर शनिवार (दि. २७) पासून सक्तीने वीज वसुली करणाऱ्या राज्य सरकार, व महावितरणच्या विरोधात इंदापूर भाजपच्या वतीने धरणे आंदोलनास सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांसमोर माजीमंत्री हर्षवर्धन पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, तुम्ही तर राज्यमंत्री आहात आम्ही कॅबिनेट मंत्री होतो. तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा कारभार आम्ही कधी केला नाही. सत्तेचा दुरुपयोग करून तालुक्यातील जनतेला वेठीस धरणार असाल तर हे योग्य घडत नाही. तुम्ही जर पहिल्याच दिवशी म्हणाला असता माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज तोडायची नाही. जर वीज तोडली तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन, अशी भूमिका तुम्ही घ्यायला हवी होती. यावेळी अप्पासाहेब जगदाळे, विलासराव वाघमोडे, शरद जामदार, शकिल सय्यद यांची भाषणे झाली. यावेळी लालासाहेब पवार उपस्थित होते.मग आम्ही सुद्धा कारखान्याच्यावतीने सहकार्य करू....महावितरणने आज शेतकऱ्यांची वीज जोडावी. महिनाभराच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची वीज बिले दुरुस्त करून द्यावीत. आम्हालाही कळते पैसे भरावे लागतील. मात्र पैसे कुठले भरायचे? त्याची माफी आम्हाला किती मिळणार, त्यातील दंड व्याज तुम्ही किती कमी करणार, हे प्रत्येक शेतकऱ्याला समजलेच पाहिजे. मग आम्ही तुम्हाला हवे ते सहकार्य करायला तयार आहोत. सर्व वीज बिले कमी करा. वन टाइम सेटलमेंट करा. ५० टक्के माफी द्या, मग तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला कारखान्यांमधून सुद्धा सहकार्य करू. यातून मार्ग काढायला आम्ही सुद्धा तयार आहोत. मात्र हुकूमशाही पद्धतीने तुम्ही विज तोडणार असाल हे खपवून घेतली जाणार नाही, असेही हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलIndapurइंदापूर