‘आरक्षण बचाव’चा नारा
By Admin | Updated: April 5, 2016 00:47 IST2016-04-05T00:47:30+5:302016-04-05T00:47:30+5:30
बोगस ओबीसी हटाव आणि आरक्षण बचाव’चा ठराव ओबीसी संघर्ष समितीच्या मेळाव्यात करण्यात

‘आरक्षण बचाव’चा नारा
पिंपरी : ‘बोगस ओबीसी हटाव आणि आरक्षण बचाव’चा ठराव ओबीसी
संघर्ष समितीच्या मेळाव्यात करण्यात
आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत कुणबींना विरोध करण्यासाठी शहरातील मूळ ओबीसी बांधवांनी एकत्र येत ओबीसी संघर्ष समितीची स्थापना केली आहे. समितीचा मेळावा पिंपरी येथे रविवारी झाला.
बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष प्रताप गुरव अध्यक्षस्थानी होते. या वेळी माजी महापौर अपर्णा डोके, ज्येष्ठ नगरसेवक वसंत लोंढे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर भालेराव, राजेंद्र राजापुरे, नगरसेवक सुरेश म्हेत्रे, शीतल
शिंदे, नगरसेविका शुभांगी लोंढे, आशा सूर्यवंशी, शिक्षण मंडळाचे सभापती
चेतन भुजबळ, माजी नगरसेवक सतीश दरेकर, संतोष लोंढे, रघुनाथ वाघ, अरुणा कुंभार आदी उपस्थित होते.
बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांनी मार्गदर्शन केले. अॅड. शिवदास महाजन, प्रदीप पवार, रमेश भोज, अशोक मगर, संतोष भालेराव, पांडुरंग दांडगे, मच्छिंद्र खोल्लम, गजानन गवळी, विजय सुतार, विष्णू निचळ, हनुमंत माळी, नंदा करे, चंद्रकांत शेटे, सुनील भालेराव, जयंत कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. या सर्वांनी मूळ ओबीसींचे आरक्षण हिसकावून घेण्यात येत असल्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्याला सर्व राजकीय पक्षही तेवढेच जबाबदार असल्याचे सांगितले. तसेच सर्वांनी ‘बोगस ओबीसी हटाव, आरक्षण बचाव’चा नारा दिला.
ईश्वर कुदळे यांनी स्वागत केले. नेहुल कुदळे यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानेश्वर भुमकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी विशाल वाळुंजकर, काळुराम गायकवाड, पी. के. महाजन, विशाल जाधव, सुरेश गायकवाड,महेश भागवत, महादेव वाळुंजकर, संदीप कुदळे यांनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)