शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

इंदौरसाठी धावणार शयनयान शिवशाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 20:04 IST

पुणे विभागातून राज्याबाहेर सुरू करण्यात आलेली ही पहिलीच शयनयान सेवा आहे.

ठळक मुद्दे ही बस दररोज सायंकाळी पाच वाजता पिंपरी-चिंचवड बसस्थानकातून सुटेल.. खासगी बससेवेशी स्पर्धा करताना एसटी महामंडळाने अनेक नवीन बदल वातानुकूलित व शयनयान वातानुकूलित या सेवांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी)कडून पिंपरी-चिंचवड ते इंदौर दरम्यान नवीन वातानुकूलित शयनयान शिवशाही बससेवा सुरू केली आहे. ही बस दररोज सायंकाळी पाच वाजता पिंपरी-चिंचवड बसस्थानकातून सुटेल, अशी माहिती पुणे विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली. पुणे विभागातून राज्याबाहेर सुरू करण्यात आलेली ही पहिलीच शयनयान सेवा आहे.खासगी बससेवेशी स्पर्धा करताना एसटी महामंडळाने अनेक नवीन बदल केले आहेत. शिवशाही बससेवेच्या माध्यमातून प्रवाशांना आकर्षित करण्यात एसटी यशस्वी ठरत आहे. वातानुकूलित व शयनयान वातानुकूलित या सेवांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एसटीने राज्याबाहेरही विविध मार्गांवर वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे. त्यामध्ये इंदौरसह बडोदा, अहमदाबाद, गोवा, हैद्राबाद आदी ठिकाणी पुण्यातून बस सोडल्या जातात. पण आतापर्यंत शयनयान बससेवा कोणत्याही मार्गावर धावत नव्हती. ही पहिली सेवा इंदौर मार्गावर सुरू केली आहे. त्यामुळे आता इंदौर मार्गावर दररोज सकाळी शिवाजीनगर स्थानकातून वातानुकूलित बैठी व सायंकाळी पिंपरी-चिंचवड येथून वातानुकूलित शयनयान शिवशाही धावत आहे. वातानुकूलित बैठी बससेवाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने शयनयान सेवा सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड स्थानकात सायंकाळी ५ वाजता व इंदौर येथूनही याच वेळेत बस सुटणार आहे. आगाऊ आरक्षणासह १२१० रुपये तिकीट दर ठेवला आहे. बसमध्ये प्रवाशांच्या मनोरंजनासाठी दोन एलईडी स्क्रीन बसविले आहे. मोबाईल चार्जरची सुविधाही उपलब्ध आहे. आगाऊ आरक्षणाची सुविधा सर्व एसटी बसस्थानकावर केली आहे. तसेच एसटीचे मोबाईल अ?ॅप व मान्यताप्राप्त खासगी एजंटमार्फतही आरक्षण करता येईल, अशी माहिती जोशी यांनी दिली. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडShivshahiशिवशाही