निवडणूक कामातून वगळा

By Admin | Updated: January 9, 2017 02:25 IST2017-01-09T02:25:17+5:302017-01-09T02:25:17+5:30

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक कामातून अपंग व महिला कर्मचाऱ्यांना वगळण्याची मागणी आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे

Skip the election | निवडणूक कामातून वगळा

निवडणूक कामातून वगळा

मंचर : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक कामातून अपंग व महिला कर्मचाऱ्यांना वगळण्याची मागणी आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विजय घिसे व सरचिटणीस सुनील भेके यांनी आंबेगावचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
प्राथमिक शिक्षकांना काम म्हणून निवडणुका व जनगणना ही कामे करावी लागतात. निवडणुकीच्या कामासाठी शिक्षण, कृषी, विमा, बँक, महसूल, आरोग्य इ. विभागांचे कर्मचारी नियुक्त केले जातात; मात्र त्यामध्ये सदर कामातून अपंग व महिला कर्मचाऱ्यांना वगळण्यात यावे, अशी मागणी राज्य संघाचे उपाध्यक्ष महेश बढे, जितेंद्र हांडे, नारायण गोरे, अशोक लोखंडे यांनी केली.
महिलांना केंद्रावर निवासाची सुविधा दुर्गम भागात उपलब्ध होत नाही. तसेच, सुरक्षिततेच्या दृष्टीने महिलांना मतदान केंद्रावर मुक्कामी राहणे गैरसोयीचे असते. तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सांगितले की, अपंग कर्मचाऱ्यांना नेमणुका दिल्या जाणार नाहीत व कर्मचारी कोटा पूर्ण झाल्यास महिला शिक्षकांना वगळण्यात येईल. (वार्ताहर)

Web Title: Skip the election