साठ वर्षांनंतर पिसे ग्रामपंचायत बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:32 IST2021-01-08T04:32:07+5:302021-01-08T04:32:07+5:30
पिसे ग्रामपंचायतीची स्थापना १९६२ साली झाली . मात्र दरवर्षी येथील निवडणूक चांगलीच चुरशीची व्हायची. दरवेळी ग्रामपंचायत निवडणूक ...

साठ वर्षांनंतर पिसे ग्रामपंचायत बिनविरोध
पिसे ग्रामपंचायतीची स्थापना १९६२ साली झाली . मात्र दरवर्षी येथील निवडणूक चांगलीच चुरशीची व्हायची. दरवेळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न व्हायचा. मात्र तो यशस्वी होऊ शकत नव्हता. मात्र अनेक वेळा प्रयत्न करून बिनविरोध न झालेली ग्रामपंचायत पिसे गावातील ज्येष्ठ, तरुण, युवक, महिलांनी एकत्र येत पुढाकार घेऊन तब्बल साठ वर्षांनंतर बिनविरोध करण्यात यश आले.
ग्रामस्थांनी श्रीनाथ, म्हस्कोबा व पीरबाबा देवस्थानांवर श्रद्धा ठेवून एकमताने सात उमेदवार निश्चित केले. त्यामुळे निश्चित केलेले सात अर्ज ठेवून बिनविरोध ग्रामपंचायत करण्यात यश आले.
वॉर्ड क्र.१ मधून रोहन नारायण मुळीक, सीमा संतोष मुळीक, द्वारकाबाई पांडुरंग मुळीक. वॉर्ड क्र.२ : गणेश बाळासो सांगळे, शोभा नंदकुमार कुटे,
वॉर्ड क्र. ३: पंडित गुलाबराव मुळीक, दिलशाद सल्लाउद्दीन सय्यद हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध झाले आहेत.