शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शर्टवर घाण पडली सांगून ६० हजार लंपास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 20:07 IST

शर्टवर घाण पडली म्हणून पाठीवर असलेली बॅग दुचाकीला अडकवून शर्ट धुण्यासाठी बाजूला गेल्याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी ६०हजार रुपये रोख रक्कम ठेवलेली बॅग चोरून नेली असल्याची घटना ऊरूळी कांचन येथे सकाळचे सुमारास घडली आहे. 

लोणी काळभोर : शर्टवर घाण पडली म्हणून पाठीवर असलेली बॅग दुचाकीला अडकवून शर्ट धुण्यासाठी बाजूला गेल्याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी ६०हजार रुपये रोख रक्कम ठेवलेली बॅग चोरून नेली असल्याची घटना ऊरूळी कांचन येथे सकाळचे सुमारास घडली आहे. 

          या संदर्भात प्रदीप भगवान देशमुख ( वय २९, रा. शिंदवणे, ता हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर प्रकार २२ जुलै रोजी सकाळी १० -वाजण्याच्या सुमारास ऊरूळी कांचन मधील आश्रम रोडवर घडला आहे. देशमुख हे पोस्ट  खात्यात हंगामी पोस्टमन  मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आयडीबीआय बॅक खात्यात पैसे जमा करावयाचे आहेत म्हणून त्यांनी इलाईट चौक आश्रम रोड येथील जिल्हा बॅंकेचे खात्यातून ६० हजार रुपये काढले होते. पैसे काढलेनंतर त्यांनी ते ऑफिस बॅगमध्ये ठेवले. बॅग पाठीवर अडकवून ते बॅकेचे बाहेर पडले. 

          ते आपली दुचाकी स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एमएच १२ जीजे ३५१९ वरून आश्रम रोडने आय डी बी आय बॅकेकडे जात असताना मागून दुचाकीवरून आलेल्या एका मुलाने त्यांना गाडीचे पाठीमागील सिटवर घाण पडली असल्याचे सांगितले. देशमुख यांनी आपली दुचाकी रस्त्याचे कडेला लावून स्विट होम मधून पाणी आणले व सिटवर टाकले. त्यानंतर तो मुलगा परत त्यांचेजवळ आला व शर्टचे पाठीमागे घाण पडली असल्याचे सांगितले. हे ऐकताच देशमुख यांनी ऑफिस बॅग दुचाकीचे हॅन्डसेटला अडकवून पुन्हा स्विट होम कडे गेले शर्ट साफ करून ते परत दुचाकीपाशी आले त्यावेळी त्यांना ऑफिस बॅग दिसली नाही म्हणून त्यांनी आजुबाजुला शोध घेतला परंतू मिळून आली नाही . म्हणून त्यांनी ऊरूळी कांचन दूरक्षेत्रात जावून ६० हजार रुपये रोख रकमेसह पोस्टाची कागदपत्रे व मुथुट फायनान्समध्ये सोन्याची अंगठी ठेवलेली पावती असा सर्व ऐवज ठेवलेली ऑफिस बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद दिली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसLoni Kalbhorलोणी काळभोर