सहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By Admin | Updated: April 29, 2017 04:21 IST2017-04-29T04:21:21+5:302017-04-29T04:21:21+5:30
पिंपरीतील नेहरुनगर येथे सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी चारला घडली.

सहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
पिंपरी : पिंपरीतील नेहरुनगर येथे सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी चारला घडली.
संदेश बाळासाहेब लांडगे (वय १२) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी- संदेशचे आई-वडील मजुरीची कामे करतात. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास त्याची आई घरी आली असता दरवाजा बंद होता. दार ठोठावूनही न उघडल्याने शेजाऱ्यांनी खिडकीचे दार तोडले असता तो लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर त्याच्या आईने त्याला खाली उतरवून वायसीएममध्ये उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. संदेशने सहावीची परीक्षा दिली होती. दोन दिवसांनी त्याचा निकाल आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.