शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अखेर 'त्या' 6 वर्षांच्या मुलाला बोअरवेलमधून सुखरूप बाहेर काढण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 09:30 IST

आंबेगाव तालुक्यातील रांजणी जाधववाडी येथे संपत जाधव यांच्या शेतातील रस्त्याच्या कडेला असलेल्या बोअरवेलमध्ये 6 वर्षांचा रवी पंडित मिल नावाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना बुधवारी (दि. २०) पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

निरगुडसर : आंबेगाव तालुक्यातील रांजणी जाधववाडी येथे संपत जाधव यांच्या शेतातील रस्त्याच्या कडेला असलेल्या बोअरवेलमध्ये 6 वर्षांचा रवी पंडित मिल नावाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना बुधवारी (दि. २०) पाच वाजण्याच्या सुमारास घडली. मुलाला बोअरवेलमधून सुखरुप काढण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर त्या बोअरवेलमधून 15 तासांनंतर मुलाला बाहेर काढण्यात यश आलं आहे. एनडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केल्यामुळेच मुलाला वाचविण्यात यश आलं आहे.बोअरवेलमध्ये पडलेला मुलगा रस्त्याचे काम करणाऱ्या मजुराचा मुलगा असून दुपारच्या सुमारास रस्त्याचे काम करीत असताना मुलगा आई-वडिलांची नजर चुकवून त्या ठिकाणी खेळत असताना ही घटना घडली. ज्या बोअरवेलमध्ये हा मुलगा पडला तो बोअरवेल सुमारे 200 फूट खोल होती.सुदैवाने मुलगा 10 ते 15 फूट खोलीवर अडकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा मुलगा रवी मूळचा शेगावचा असून रवीचे आई-वडील रोडवर मजुरीने काम करतात. मंचर पोलिसांच्या सहकार्यानं एनडीआरएफच्या टीमनं मुलाला सुखरूप वाचवलं आहे. परिसरातील नागरिकांना ही घटना समजल्यापासून घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली आहे. 

टॅग्स :Puneपुणे