वात्सल्य वसतिगृहातून सहा महिला फरार
By Admin | Updated: July 13, 2015 23:46 IST2015-07-13T23:42:58+5:302015-07-13T23:46:41+5:30
सुरक्षारक्षक महिलेस मारहाण : गुन्हा दाखल

वात्सल्य वसतिगृहातून सहा महिला फरार
नाशिक : पंधरा दिवसांपूर्वी एका हॉटेलवरील छाप्यात पोलिसांनी पकडलेल्या व वात्सल्य महिला वसतिगृहात पाठविण्यात आलेल्या सहा महिलांनी सुरक्षारक्षक महिलेस मारहाण करून पलायन केल्याची घटना शनिवारी (दि़११) रात्रीच्या सुमारास घडली़ या मारहाणीत जखमी झालेल्या महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
आहेत़
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल कुणालवर पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांनी छापा टाकला होता़ यामध्ये पश्चिम बंगला येथील सहा महिलांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी वात्सल्य महिला वसतिगृहात करण्यात आली होती़ शनिवारी (दि़११) रात्री अकरा वाजेच्या सुमारास येथील महिला सुरक्षारक्षक सावित्री नारायण निकम (शेलार) यांना मारहाण करून गेटच्या चाव्या हिसकावून पळ काढला़
या महिलांनी निकम यांना मारहाण करण्याबरोबरच त्यांच्या हाताला चावाही घेतला आहे़ या मारहाणीत जखमी झालेल्या निकम यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ या फरार महिलांचा दोन दिवस शोध घेऊनही त्या सापडलेल्या नाहीत़ दरम्यान, या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)