शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

मोटारीने ठोकरले सहा वाहनांना, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 03:30 IST

भरधाव जाणा-या मोटारीवरील नियंत्रण सुटून झालेल्या विचित्र अपघातात एका गॅरेज कामगारासह दोघांचा मृत्यु झाला़ हा अपघात मालधक्का चौकातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर भवनाशेजारील रस्त्यावर शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला.

पुणे - भरधाव जाणा-या मोटारीवरील नियंत्रण सुटून झालेल्या विचित्र अपघातात एका गॅरेज कामगारासह दोघांचा मृत्यु झाला़ हा अपघात मालधक्का चौकातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर भवनाशेजारील रस्त्यावर शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला़अरुण शिवाजी गायकवाड (वय ५७, रा. डी.वाय. हॉस्पिटलसमोर, वल्लभनगर, पिंपरी), फ्रँक अलेक्झेंडर डीक (वय ५८, रा.न्यु मोदी खाना, एसआरए बिल्डीग, भवानी पेठ) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी चालक राजेंद्रवसंत लोडगे (वय ४५, रा. नसरापुर) याला अटक केली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेडकर भवन शेजारी के. ई. एम. रुग्णालयाकडे जाणाºया रस्त्यावर कार पेटींग व दुरूस्तीचे गॅरेज आहे. त्याठिकाणी फ्रँक हा काम करत होता. तर, अरूण गायकवाड हे पिंपरीवरून त्यांची कार दुरूस्तीसाठी घेऊन आले होते. शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या फ्रँक हा एका कारचे काम करत होता. तर, गायकवाड हे त्यांच्या कारचे काम सुरु असल्याने तेथे उभारले होते. हे काम गॅरेजसमोर असणाºया रस्त्यावर सुरु होते. त्याठिकाणी आणखी काही कार उभा केलेल्या होत्या. त्याच दरम्यान चालक राजेंद्र लोडगे हा त्याची आई आजारी असल्याने त्यांना घेऊन त्याच्याकडील मोटारीतून घेऊन भरघाव वेगात नेहरु रोडने येऊन ससून रुग्णालयाकडे जात होता. मात्र, त्याचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने गॅरेजसमोरील वाहनांना उडवत काही अंतरावर गेला. यामध्ये त्यांने चार मोटारी आणि दोन दुचाकींना ठोकले़ तेथे आलेले अरूण गायकवाड हे या भीषण अपघातात दोन मोटारींच्या मध्ये अडकले. तर, फ्रँक यांना जोरात धडक बसल्याने उडून एका मोटारीच्या काचेवर जाऊन पडले़ यात दोघेही गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तात्काळ पोलिस नियत्रंण कक्षाला माहिती दिली. ही माहिती समर्थ पोलिसांना देण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत नागरिकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात