चैतन्यच्या खुनातील सहा जण अटक
By Admin | Updated: March 9, 2015 00:45 IST2015-03-09T00:45:35+5:302015-03-09T00:45:35+5:30
उरुळी कांचन येथील चैतन्य ज्ञानदेव गवळी याच्या खूनप्रकरणात आणखी सहा जणांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व

चैतन्यच्या खुनातील सहा जण अटक
लोणी काळभोर : उरुळी कांचन येथील चैतन्य ज्ञानदेव गवळी याच्या खूनप्रकरणात आणखी सहा जणांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व लोणी काळभोर गुन्हे शोध पथकाने आज जेरबंद केले आहे. आतापर्यंत या घटनेचा सूत्रधार वगळता सर्वांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक अभिमान पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी ऋषभ रमेश बडेकर (वय १९ वर्षे, रा. बडेकरनगर, उरुळी कांचन), प्रणव सुरेश रणसिंग (वय १८ वर्षे), लल्लू ऊर्फ शुभम उत्तम लोंढे(वय १८ वर्षे), विल्सन रॉबिन कांबळे (वय १८ वर्षे), योगेश नागनाथ बोबडे (वय १८ वर्षे) व गणेश पांडुरंग कदम (वय २० वर्षे, पाच जण रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन) या सहा जणांना आज अटक करण्यात आली.
खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून, या सहा जणांना पुणे परिसरांतील विविध ठिकाणांवरून ताब्यात घेतले. या प्रकरणी आजपर्यंत एकूण अकरा जणांना अटक करण्यात आली आहे. आठ मार्च रोजी कर्नाटक येथे पकडण्यात आलेल्या अजिंक्य उत्तम कांबळे यास न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)