शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

खडकीतील चिखलवाडी येथे स्कूल व्हॅनच्या धडकेत सहा विद्यार्थी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 16:15 IST

खडकी : चिखलवाडीतील माता रमाबाई आंबेडकर शाळेच्या पटांगणात विद्यार्थी कवायत करीत असताना स्कूल व्हॅनने कवायत करणा-या विद्यार्थ्यांना जोरात धडक दिली.

खडकी : चिखलवाडीतील माता रमाबाई आंबेडकर शाळेच्या पटांगणात विद्यार्थी कवायत करीत असताना स्कूल व्हॅनने कवायत करणा-या विद्यार्थ्यांना जोरात धडक दिली. गुरुवारी सकाळी घडलेल्या घटनेत सहा विद्यार्थी जखमी झाले.या प्रकरणी व्हॅन चालक मोईन शेख व रिक्षाचालक रशीद कुरेशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत हकीकत अशी की, सकाळी साडेनऊच्या दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांचा पीटीचा तास सुरू असल्याने मैदानामध्ये विद्यार्थी कवायत करीत होते. त्या वेळेस व्हॅन चालक ( एमएच १२ क्यू ए ४०५१) मोईन शेख हा रिक्षाचालक रशीद शेख याला व्हॅन चालवण्यास शिकवत होता. त्यावेळी व्हॅनवरील नियंत्रण सुटल्याने मैदानात कवायत करणा-या विद्यार्थ्यांना व्हॅनने धडक दिली. त्यात आफताब शेख या विद्यार्थ्यांच्या पायावरून व्हॅनचे चाक गेल्यामुळे पायाला गंभीर दुखापत झाली.यश जाधव या विद्यार्थ्यांच्या डोक्याला जबर मार लागला. तर प्रियश साळवे, स्वप्नील वाल्हेकर, वैभव रस्ते, इरफान शेख हे विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करीत व्हॅन चालक व रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. अपघाताचे वृत्त समजताच नगरसेवक विजय शेवाळे, बंडू ढोरे नगरसेविका सुनीता वाडेकर, माजी नगरसेविका अर्चना कांबळे , माजी नगरसेवक आनंद छाजेड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुणे महापालिका शिक्षण मंडळ दुर्लक्षपणामुळेच असे प्रकर घडू लागल्याच्या संतप्त प्रतिक्रया त्यांनी व्यक्त केल्या. खडकी पोलीस पुढील तपास करीत आहे .

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे