सामूहिक बलात्कारप्रकरणी सहाजण ताब्यात
By Admin | Updated: May 27, 2017 01:35 IST2017-05-27T01:35:48+5:302017-05-27T01:35:48+5:30
पिंपरीतील अजमेरा कॉलनीत आजीकडे राहण्यास आलेल्या एकवीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

सामूहिक बलात्कारप्रकरणी सहाजण ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरीतील अजमेरा कॉलनीत आजीकडे राहण्यास आलेल्या एकवीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार सुमारे दीड महिन्यांनी उघडकीस आला आहे. यातील सातपैकी सहा आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.
सौरभ रमेश शेट्टी, नसीज अहमद इन्सान अली खान, हर्षल देविदास भाटिया, गुरुजितसिंग दसर, दानिश मेहबूब चौधरी व सिद्धार्थ राजेंद्र झपके (सर्व रा. मासुळकर कॉलनी, अजमेरा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, एक फरार आहे.
मित्रांच्या ओळखीच्या मित्रांनीही पीडितेवर अत्याचार केले. हा प्रकार मार्च ते मे या कालावधीत झाला आहे.