शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन ठरलं! अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार, किती दिवस चालणार?
2
मोठी बातमी! अमोल किर्तीकर यांना सीसीटीव्ही फूटेज देण्यास उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार
3
इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत, पाहा व्हिडीओ
4
अजय जडेजानं वन डे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानला मार्गदर्शन करण्यासाठी एकही रुपया घेतला नाही
5
“छगन भुजबळांनी बंड पुकारून आपले बळ दाखवावे, विधानसभेत धडा शिकवावा”: विजय वडेट्टीवार
6
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: वाह ‘गुरु’! मातीचे सोने करण्याची शक्ती असलेला ग्रह; चंद्राशी ‘युती’ म्हणजे ‘राजयोग’च
7
तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली, 'हसत राहा...'
8
Maharashtra Politics : 'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं
9
“आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार”; जयंत पाटील यांनी दिली गॅरंटी!
10
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'
11
अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार
12
“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार
13
ICC ने जाहीर केलं टीम इंडियाचं Super 8 चं वेळापत्रक; जाणून घ्या कधी, केव्हा व कोणाला भिडणार
14
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
15
Photos: तुम हुस्न परी... डिझायनर ड्रेस, फॅशनेबल गॉगल; अवनीत कौरचं 'ग्लॅमरस' फोटोशूट
16
या पेनी स्टॉकच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, किंमत ₹5 पेक्षाही कमी, एकाच महिन्यात दिला 55% परतावा!
17
RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले...
18
'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या
19
अमेरिकन रॅपर ड्रेक मालामाल! भारत-पाक वर्ल्ड कप सामन्यात सट्टात जिंकले ७ कोटी!!
20
शशांक केतकरच्या तक्रारीनंतर BMC ची तातडीने कारवाई, स्वच्छ केला परिसर; अभिनेता म्हणाला...

पिसाळलेल्या कुत्र्याचा सहा जणांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 2:48 AM

सुतारपाडा येथे मंगळवार दुपारी पिसाळलेल्या कुत्र्याने सहा जणांना लागोपाठ चावे घेऊन गंभीर जखमी केल्याने परिसरात एकच घबराट पसरली.

तलासरी : सुतारपाडा येथे मंगळवार दुपारी पिसाळलेल्या कुत्र्याने सहा जणांना लागोपाठ चावे घेऊन गंभीर जखमी केल्याने परिसरात एकच घबराट पसरली. काकड्या वळवी, राजेश उंबरसडा, नवसाद अली, शमू शाह, चैतु डावरे, संती हडळ या सहा जणांना हे कुत्रे एका पाठोपाठ चावत सुटल्याने भीतीने महिलांनी आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन घरात आश्रय घेतला गंभीर जखमी झालेल्या या सहा जणांना नागरिकांनी तात्काळ तलासरी ग्रामीण रुग्णालयात दाखल तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना बलसाड येथील रुग्णालयात हलविले. सध्या या परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून त्यांचा उपद्रव वाढला आहे, रात्री एकट्याने फिरणे धोकादायक झाले आहे. पिसाळलेला हा कुत्रा अजून मोकाट फिरत आहे.>नालासोपाऱ्यात कुत्री सर्वाधिक : वसई विरार पालिका आता हा भटक्या कुत्र्याचा विषय गंभीरतेने घेत असली तरी देखील आता फार उशीर झाला असल्याचे बोलले जात आहे. वसई तालुक्यातील लोकसंख्येत, अनधिकृत बांधकामात, गुन्हेगारीमध्ये प्रथम क्रमांकावर असलेल्या नालासोपारा शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या देखील प्रथम क्रमांकावर आहे.परिणामी कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांना ये-जा करणे मुश्किल केले आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे व त्यावर काम सुरु आहे असे पालिकेने सांगितले आहे. मात्र अजून ते कधी पूर्ण होणार हे स्पष्ट झाले नसल्याने कुत्र्यांची दहशत कायम आहे.>वसई-विरारमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत सुरूचविरार : वसई-विरार मध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. भटक्या कुत्र्यांच्या संख्येवरवर नियंत्रण ठेवण्यात पालिका हतबल होताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये पालिका प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे आता भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणा बाहेर गेली आहे. याचाच त्रास सामान्यांना सहन करावा लागत आहे. भटक्या कुत्र्यांमुळे अनेकांना जीव देखील गमवावे लागले. विरार, नालासोपारा, वसई च्या गलो गल्लीत भटक्या कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत आहे. भटक्या कुत्र्यांचे हल्लेही लोकांवर दिवसेंदिव वाढतच चालले आहेत. पालिकेने अधिकृतपणे आतापर्यंत श्वानगणना केली नसली तरी ३५ हजारांहून अधिक भटकी कुत्री आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला यांना रस्त्यावरून चालणे भटक्या कुत्र्यांनी कठीण केले आहे. शहराच्या काही भागात नाक्या-नाक्यावर रात्रीच्या वेळेस चोरांसारखे भटके कुत्रे अगदी टोळीने उभे असतात. दुचाकी आली की त्यांच्या मागे हे कुत्रे एका मागून एक धावू लागतात. यामुळे अपघातही घडले आहेत. पालिकेच्या रुग्णालयानुसार गेल्या ६ महिन्यात ३ हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला असून खाजगी रुग्णालयाची आकडेवारी यात जोडली तर हि संख्या दुप्पट होईल. दर महिन्याला हजार लोकांना तरी हे कुत्रे चावे घेत असल्याचा अंदाज आहे. पालिकेने पाचही प्रभाग समित्यांमध्ये किमान दोन-दोन श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू करून एकाचवेळी प्रभावीपणे निर्बिजीकरणाची मोहीम राबविल्यास भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होऊ शकते. गेल्या सहा वर्षात पालिकेचे एकमेव श्वाननिर्बिजीकरण केंद्र नवघर पूर्व येथे चालू आहे. पालिकेने पाच ठिकाणी अशी केंद्रे सुरू करण्याचा ठराव साधारण दोन-अडीच वर्षांपूर्वी केला होता. मात्र पुढे त्याची अंमलबजावणी झाली तर नाहीच मात्र जे होते त्याचीही दयनीय अवस्था झाली आहे.