शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

धुक्यामुळे पुण्यातून दिल्लीसह उत्तरेकडे जाणारी सहा विमाने रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 09:51 IST

धुक्यामुळे या विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत, याबाबतची माहिती पुणे विमानतळ प्रशासनाने दिली...

पुणे : राजधानी दिल्लीत धुके पसरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा मोठा परिणाम विमान वाहतुकीवर झाला. पुण्यातून दिल्लीसह प्रयागराज, राजकोट, अहमदाबाद या ठिकाणी जाणारी पाच विमाने आणि चेन्नईला जाणारे विमान अशा सहा विमानांची उड्डाणे रविवारी रद्द करण्यात आली. धुक्यामुळे या विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत, याबाबतची माहिती पुणे विमानतळ प्रशासनाने दिली.

खराब हवामानाचा फटका हवाई वाहतुकीला वारंवार बसत आहे. पुणे ते दिल्ली विमानसेवेला प्रवाशांची गर्दी आहे. पुण्यातून अनेक उड्डाणे दिल्लीसाठी दररोज होतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत मोठ्या प्रमाणात धुके पडत असल्याने विमान उड्डाणावर मोठा परिणाम होत आहे. खराब हवामानामुळे रविवारी विमानांचे मार्ग वळवण्यात आले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ फ्लाइट जयपूरच्या दिशेने, तर एक फ्लाइट मुंबईच्या दिशेने वळवण्यात आली आहे. ही सर्व उड्डाणे पहाटे ४:३० ते सकाळी ७:३० च्या दरम्यान वळवण्यात आली. दिल्लीतील कडाक्याच्या थंडीबरोबरच दाट धुक्याचा दुहेरी सामना करावा लागत असून, पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. त्याचा परिणाम विमान वाहतुकीवर होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

टॅग्स :Puneपुणेdelhiदिल्ली