बलात्कार करून पती-पत्नीचा खून करणाऱ्या सहा नराधमांना अटक

By Admin | Updated: September 3, 2016 03:12 IST2016-09-03T03:12:28+5:302016-09-03T03:12:28+5:30

जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या जुन्नर तालुक्यातील साकोरी गावातील दुहेरी खून आणि सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यातील सहा आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या

Six assailants arrested for raping a husband and wife | बलात्कार करून पती-पत्नीचा खून करणाऱ्या सहा नराधमांना अटक

बलात्कार करून पती-पत्नीचा खून करणाऱ्या सहा नराधमांना अटक

पुणे : जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या जुन्नर तालुक्यातील साकोरी गावातील दुहेरी खून आणि सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यातील सहा आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) जेरबंद केले आहे. या आरोपींकडून ठाण्यातील हिल लाईन भागातील दरोड्यासह आणखी एक तिहेरी खून उघडकीस आणण्यात एलसीबीला यश आले आहे. ही कारवाई पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी दिली. ही घटना सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी पहाटेच्या दरम्यान घडली होती.
ऋषी ऊर्फ ऋषन अशोक काळे (वय १९, रा. कासारवाडी रेल्वे स्टेशन, कासारवाडी), अनिल ऊर्फ तिऱ्या ढोम्या काळे (वय ३0, रा. माळवाडी, तळेगाव दाभाडे, मावळ. मूळ रा. मुखई जातेगाव, शिक्रापूर), मथ्या ऊर्फ नामदेव यमराज भोसले (वय १९, रा. जाधववाडी, चिखली. मूळ रा. गणेगाव खालसा, शिरूर), नागेश ऊर्फ सचिन अशोक काळे (वय ३२, रा. रांजणगाव मशिदीजवळ), आकाश ऊर्फ डोळा कळसिंग भोसले (वय २0, रा. आकुर्डी रेल्वे स्टेशन, आकुर्डी. मु आणि गोविंद ऊर्फ नीलेश सुरेश भोसले (वय २0, रा. माळवाडी, तळेगाव दाभाडे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
आरोपींनी साकोरीमधील शंकर भीमाजी पानसरे (वय ४५) यांच्या घरात सोमवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकला होता. कुऱ्हाडीने घाव घालून शंकर यांचा खून केल्यानंतर त्यांची पत्नी संगीता (वय ४0) यांच्यावर सामूहिक बलात्कार करून त्यांचाही खून केला होता. पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अतिरिक्त अधीक्षक राजकुमार शिंदे, वरिष्ठ निरीक्षक राम जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली होती.
आरोपींनी २३ जून रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ तालुक्यातील करवले येथील शंकर भंडारी (वय ६0) यांच्या घरावर दरोडा टाकत भंडारी यांच्यासह त्यांची पत्नी फसुबाई (वय ५0) आणि त्यांचा मुलगा शनी (वय २0) यांचा डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला होता. (प्रतिनिधी)

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दरोडा, दुहेरी खून आणि सामूहिक बलात्काराचा गंभीर गुन्हा ३ दिवसांत उघडकीस आणून ६ आरोपींना गजाआड केल्याने अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे. डॉ. जाधव यांनी पथकास २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Web Title: Six assailants arrested for raping a husband and wife