गोहे येथील खूनप्रकरणी सहा जणांना केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:08 IST2021-07-09T04:08:34+5:302021-07-09T04:08:34+5:30

ओंकार घोलप, सूरज घोलप, अनिकेत घोलप, गोविंद उर्फ गाविदया विठ्ठल मधे (वय २९), श्रीराम कैलास सूर्यवंशी (वय २४), ...

Six arrested in Gohe murder case | गोहे येथील खूनप्रकरणी सहा जणांना केली अटक

गोहे येथील खूनप्रकरणी सहा जणांना केली अटक

ओंकार घोलप, सूरज घोलप, अनिकेत घोलप, गोविंद उर्फ गाविदया विठ्ठल मधे (वय २९), श्रीराम कैलास सूर्यवंशी (वय २४), अक्षय उर्फ सोन्या अनंता येवले (वय २७) यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींनी दि. २७ जून रोजी कोयता, रॉड, चाकू यांच्या सहाय्याने कैलास गेंगजेच्या डोक्यात, डाव्या कानाच्या वर, डाव्या गुडघ्याच्या बाजूला, उजव्या गुडघ्याच्या खाली, पाठीवर, हातांवर, पायांवर मारहाण करून डावा पाय नडगीमध्ये मोडून गंभीर दुखापत केली होती. उपचारादरम्यान पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला होता.

संबंधित फरार आरोपींना पकडण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंबाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे, पोलीस हवालदार देवराम धादवड, पोलीस नाईक संदीप लांडे, दत्तात्रय जढर, दीपक काशिद, अविनाश कालेकर, पोलीस शिपाई आतिष काळे, अमोल काळे, जालिंदर रहाणे, पोलीस मित्र स्वप्निल कानडे यांनी संबंधित आरोपींचा शोध घेऊन अटक केली.

Web Title: Six arrested in Gohe murder case