वडगावला सहा सशस्त्र दरोडेखोरांना अटक
By Admin | Updated: November 10, 2014 22:50 IST2014-11-10T22:50:42+5:302014-11-10T22:50:42+5:30
दरोडय़ाच्या तयारीत निघालेल्या 6 जणांच्या सशस्त्र टोळीला वडगाव निंबाळकर पोलिसांनी जेरबंद केले.

वडगावला सहा सशस्त्र दरोडेखोरांना अटक
वडगाव निंबाळकर : दरोडय़ाच्या तयारीत निघालेल्या 6 जणांच्या सशस्त्र टोळीला वडगाव निंबाळकर पोलिसांनी जेरबंद केले.
पोलिसांनी रविवार, दि. 9 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास ही कारवाई केली. मोहन वामन पवार (वय 35, रा. पाटस रोड, बारामती), नीलेश हनुमंत तांबे (वय 32, रा. गुणवडी, ता. बारामती), किशोर सतिश शिवरकर (वय 21), मनोज सिंग (वय 21, दोघे रा. सहयोग सोसायटी बारामती), विशाल प्रकाश मलगुंडे (वय 24), राहुल चंद्रकांत मलगुंडे (वय 25 दोघेही रा. मलगुंडेवस्ती जळोची, ता. बारामती) या सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमेश्वरनगर परिसरात संशयितरीत्या काही तरुण फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून साध्या वेशातील पोलिसांनी त्यांचे निरीक्षण केले. तेव्हा आरोपींकडे शस्त्र असल्याचे दिसले. यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश ¨शदे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल ओमासे, भगवान थोरवे, दत्तात्रय मोरे, धर्मवीर खांडे यांच्या पथकाने निरा-बारामती मार्गावर सापळा रचला.
सोमेश्वरनगरच्या बाजुने आरोपींची तवेरा गाडी (क्रमांक एमएच 23/ई 5225) ही वडगांव निंबाळकर ठाण्यासमोर आली असता या गाडीला वाहने आडवी लावून पोलिसांनी मोठय़ा शिताफीने आरोपींना पकडले.
त्यांच्या वाहनामध्ये तलवार, सुरा, लोखंडी गज, मिरची पावडर, नायलन दोरी, बॅटरी, काठी असे दरोडय़ा व चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य आढळुन आले. आरोपींना 7 दिवसांची कोठडी मागितली आहे. त्यामध्ये काही आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)