टँकर बंदने ग्रामस्थांचे हाल
By Admin | Updated: April 5, 2016 00:53 IST2016-04-05T00:53:27+5:302016-04-05T00:53:27+5:30
निमगाव केतकी व वाड्यावस्त्यांवर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरू असलेले पाण्याचे टँकर अचानक बंद करण्यात आले आहेत.

टँकर बंदने ग्रामस्थांचे हाल
निमगाव केतकी : निमगाव केतकी व वाड्यावस्त्यांवर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरू असलेले पाण्याचे टँकर अचानक बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. बंद करण्यात आलेले पाण्याचे टँकर तातडीने पुन्हा सुरू करण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जिल्हा परिषद सदस्य देवराज जाधव यांनी सांगितले, की परिसरातील पाणीसमस्या गंभीर आहे. निमगावमधील ग्रामस्थांनी पाण्यासाठी संघर्ष केल्यानंतरही पंचायच समिती प्रशासनाने टँकर सुरू केले नव्हते. स्वखर्चाने पाण्याचा टँकर सुरू केल्यानंतर काही दिवसांनी पंचायत समितीला जाग आली. मात्र, शनिवारपासून (दि. २) अचानक पाण्याचे टँकर बंद करण्यात आले आहेत. खरा उन्हाळा मे-जूनपर्यंत असतो. यामुळे पाण्याचे बंद करण्यात आलेले टँकर तातडीने सुरू करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. वरकुटे तलावात पाणी सोडल्याने टँकर बंद
४पंचायत समितीने पाठवलेल्या पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे, की निमगाव केतकीला पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या वरकुटे येथील पाझर तलावामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे निमगाव केतकी येथील टँकरचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात येत आहे. हे पत्र गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आले.पाझर तलावात
पाणी सोडावे
४नीरा डाव्या कालव्यामधून सोडण्यात आलेले पाणी वरकुटे येथील पाझर तलावामध्ये फक्त तीनच दिवस सोडण्यात आले. सध्या ते बंद करण्यात आले आहे. या तलावामध्ये आणखी दोन दिवस पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याची अवश्यकता असल्याचे देवराज जाधव यांनी सांगितले.