दुपारी एकला सायबर कॅफे झाली हाऊसफुल्ल...
By Admin | Updated: June 18, 2014 02:21 IST2014-06-18T02:21:39+5:302014-06-18T02:21:39+5:30
दहावी आॅनलाइन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सायबर कॅफेत गर्दी केली होती. याचबरोबर मोबाइलवर निकाल जाणून घेण्यात अनेकांनी पसंती दिली.

दुपारी एकला सायबर कॅफे झाली हाऊसफुल्ल...
पिंपरी : दहावी आॅनलाइन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सायबर कॅफेत गर्दी केली होती. याचबरोबर मोबाइलवर निकाल जाणून घेण्यात अनेकांनी पसंती दिली. गुुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणारे फलक शाळेत रंगविले गेले. निकाल स्पष्ट झाल्याने अकरावी प्रवेशाची उत्सुकता आता लागली आहे.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज दहावीचा निकाल आॅनलाइन जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एकनंतर निकाल घोषित करण्यात आला. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता शिगेला लागली होती. सायबर कॅफेत जाऊन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. अपेक्षित गुण मिळाल्याने एकमेकांचे अभिनंदन करून जल्लोष करीत होते. कोणाला किती गुण मिळाले याची चर्चा त्यांच्यात रंगली.
अनेकांनी मोबाइलवरच निकाल जाणून घेतला. गुणपत्रिकेची प्रत काढण्यासाठी सायबर कॅफेचा आधार घेण्यात आला. विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेऊन सायबरचालकांनी नेहमीच्या दरात वाढ करून २० ते २५ रुपयेप्रमाणे प्रिंट काढून दिली.
निकाल तपासण्यात
शिक्षकांची कसरत
आॅनलाइन निकाल असल्याने विद्यार्थ्यांची कामगिरी कशी आहे. हे तपासण्यात शिक्षकांना खूपच कसरत करावी लागली. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण तपासून त्यांची क्रमवारी करणे, ९० व ८० टक्क्यांवरील विद्यार्थ्यांची यादी करणे, तसेच विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्यांची नावे काढण्यासाठी कसरत करावी लागली. किचकट यादीतून नावे शोधताना शिक्षकांच्या नाकीनऊ आले होते. प्रथम तीन क्रमांकाचे तसेच, विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून शाळेत बोलावून
घेतले गेले. त्यांचे पुुष्पगुच्छ देऊन शिक्षकांनी विशेष गौरव केला. शाळेच्या फलकावर त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या.(प्रतिनिधी)