प्राणिसंग्रहालयात होणार सिंहगर्जना

By Admin | Updated: January 12, 2017 02:36 IST2017-01-12T02:36:36+5:302017-01-12T02:36:36+5:30

कात्रजच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून

Sinhalanguage will take place at the zoos | प्राणिसंग्रहालयात होणार सिंहगर्जना

प्राणिसंग्रहालयात होणार सिंहगर्जना

पुणे : कात्रजच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून प्राणी-पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.
मागील आठवड्यात प्राणिसंग्रहालयात सिंंहाचे आगमन झाले असून, सध्यातरी प्राणिसंग्रहालयाच्या नियमानुसार या सिंहांना नवीन जागी अधिवासात व वातावरणात राहण्याची सवय झाल्यावरच त्यांना पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. सध्या तरी या नवीन पाहुण्या सिंहाबाबत प्राणिसंग्रहालयाच्या वतीने कोणतीही माहिती उपलब्ध केली जात नसली तरी या प्राणिसंग्रहालयात सिंह नसल्याने ती कमी जाणवत होतीच. या आणलेल्या सिंहांमध्ये नर आणि
मादी असल्याची माहिती मिळत आहे.
अन्य प्राणिसंग्रहालयात जे प्राणी जास्त होतात, ते प्राणी दुसऱ्या प्राणिसंग्रहालयात दिले जातात व अशा प्रकारे प्राण्यांच्या संख्येत वाढ केली जात असते. याच स्वरूपात या सिंहाची जोडी आणली असण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
  सध्या तरी या प्राणिसंग्रहालयामध्ये नूतनीकरण सुरू असून, नवीन येणाऱ्या प्राण्यांसाठी खंदकाचे काम केले जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. येत्या काही वर्षात नवीन आराखड्यानुसार बराचसा बदल पाहावयास मिळणार आहे.

Web Title: Sinhalanguage will take place at the zoos