शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीच्या बहाण्याने ५ लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या भामट्यास सिंहगड पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 18:01 IST

 सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी अक्षय धावडे यांची क्रिकेट खेळताना ऋषिकेश नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती

धायरी: क्रिकेट खेळताना झालेल्या ओळखीतून मैत्रीचे नाते तयार करून एका भामट्याने मित्रालाच गंडा घातल्याचा प्रकार सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. ऋषिकेश मोहन बोंबले (वय: २८ वर्षे. रा. खेड, मंचर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अक्षय काळुराम घावडे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

 सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी अक्षय धावडे यांची क्रिकेट खेळताना ऋषिकेश नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. त्याने हळुहळु ओळख वाढवुन मैत्री केली. जवळची मैत्री झाल्याने ऋषिकेशने जॉब व राहण्याचा प्रॉब्लेम असल्याचे अक्षयला  सांगितले.  नव्याने झालेला मित्र अडचणीत आहे हे पाहुन त्याने ऋषिकेशला मित्राची रुम राहण्यास दिली. तसेच स्मार्ट फोन व होंडा दुचाकी वापरण्यास दिली. दोघेही नाश्ता करत असताना ऋषिकेशने गर्लफ्रेन्डवर इम्प्रेशन मारण्यासाठी अक्षयची  १५ तोळ्याची सोन्याची चैन मागुन घेवुन गळ्यात घातली.

नाश्ता करुन झाल्यावर ऋषिकेशने माझा मित्र येणार आहे, जरा तिकडे बघ असे फिर्यादीस सांगून त्यांचे लक्ष विचलित करुन मोबाईल फोन, होंडा दुचाकी व १५ तोळ्याची सोन्याची चैन असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल घेवुन फसवणुक करुन पसार झाला होता. याबाबत १६ डिसेंबर रोजी अक्षय धावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात  फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपी ऋषिकेश हा आपली राहण्याची ठिकाणे सारखे बदलत होता. त्याचा शोध घेत असताना तांत्रिक तपासाच्या मदतीने मिळालेल्या माहीतीवरुन आरोपीस ताब्यात  घेवुन सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे.

तपासांमध्ये आरोपी ऋषिकेशकडुन होडा दुचाकी व स्मार्ट फोन जप्त केले आहेत. तसेच १५ तोळ्याची चैन ही एका नामांकित फायनान्स कंपनीत गहाण ठेवुन ४ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.चैन फायनान्स कंपनीकडुन हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरु असुन अधिक तपास सुरु आहे. सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील त्याचेवर चंदननगर पोलीस स्टेशन व चिखली पोलीस स्टेशन येथे अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. नागरीकांनी अनोळखी इसमांशी मैत्री व मदत करताना योग्य ती खबरदारी घ्यावी व फायनान्स कंपनीने ग्राहकांना कर्ज देताना योग्य त्या कागदपत्रांची पडताळणी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त पोर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त पी. डी. राठोड,  सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, पोलीस निरीक्षक ( गुन्हे)  प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस कर्मचारी राजेश गोसावी, किशोर शिंदे, दयानंद तेलंगे - पाटील, अविनाश कोंडे, रफिक नदाफ यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस