शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी ठोकल्या सोनसाखळी चोराला बेडया;१ लाख ३६ हजारांचा मुद‌ेमाल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 13:47 IST

तीन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावुन चोरी केल्याचे निष्पन्न..

पुणे (धायरी): सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वेगवेगळया ठिकाणी सोनसाखळी चोरणाऱ्याचोरट्याला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक लाख छत्तीस हजारांचा मुद‌ेमालही हस्तगत करण्यात आला आहे.सनी साल्वकुमार नायडु (वय :२८ वर्षे, रा. लाडली सेंटर पुढे, धायरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.   सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी दया तेलंगे - पाटील, दत्ता सोणवणे, व श्रीकांत दगडे यांनी सीसीटीव्ही फुटेज व मिळालेल्या माहितीवरून सराईत सोनसाळखी चोऱ्या करणारा आरोपीला ताब्यात घेवुन त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावुन चोरी केल्याचे निष्षन्न झाले. तसेच त्याच्याकडून एक लाख छत्तीस हजार रुपयांचे तीन मंगळसुत्र जप्त करण्यात आले आहेत.

मित्राच्या मोटारसायकलवरून करत होता चोरीआरोपी सनीचे शिक्षण दहावी झाले असून तो एका मोबाईल कंपनीत कामास आहे. पैशांच्या हव्यासापोटी त्याने वडगांव बुद्रुक परिसरात जानेवारी व ऑगस्ट महिन्यात ह्या तीन चोऱ्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या मित्राने लॉकडाऊनमध्ये गावी जाताना त्याच्याकडे मोटारसायकल ठेवून गेला होता. चोरी करताना त्याने मोटारसायकलच्या नंबर प्लेटवरील एक नंबरही खोडला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून खोडलेल्या नंबरच्या व्रणवरून पोलीस मोटारसायकलच्या मालकापर्यंत पोहचले आणि सदर तीनही गुन्ह्यांचा उलगडा झाला.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त पी.डी. राठोड , वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकिशोर शेळके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चेतन थोरबोले, पोउपनि सुधीर घाडगे, पोलीस कर्मचारी दत्ता सोनवणे, दयानंद तेलंगेपाटील, श्रीकांत दगडे, पुरुषोत्तम गुन्ला योगेश झेंडे, हरीष गायकवाड, किशोर शिंदे, अविनाश कोंडे, रफिक नदाफ यांचे पथकाने केली आहे

टॅग्स :PuneपुणेThiefचोरArrestअटकPoliceपोलिस