शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड पोलिसांनी वडगाव बुद्रुक येथे केले आठ लाखांचे मेफेड्रॉन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 16:37 IST

सिंहगड रस्ता पोलिसांत गुन्हा दाखल; एकाला अटक 

धायरी: सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत दरवर्षी तरुणाई मोठ्या उत्साहात करताना बघावयास मिळते. यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने तसेच पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम उघडली आहे. त्या अनुषंगाने सिंहगड रस्ता पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ८ लाख ८ हजार चारशे रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. मोहम्मद अब्दुल रेहमान इरशाक ( वय : २३, मुंढवा, पुणे मूळ रा.केरळ) याच्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे.  सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी किशोर शिंदे व धनाजी धोत्रे यांना मिळालेल्या बातमी वरून वडगांव बुद्रुक येथील भन्साळी कॅम्पस सोसायटीसमोर एक व्यक्ती अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी मोपेड गाडीवर बसलेला असल्याचे समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने त्या व्यक्तीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याजवळ ६३ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन ( एम डी) अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या जवळ बाळगताना आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. 

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड,सहायक पोलिस आयुक्त पोमाजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस देविदास घेवारे,गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, अविनाश शिंदे, पोलीस कर्मचारीमोहन भुरुक, आबा उत्तेकर,राजेश गोसावी यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :PuneपुणेDhayariधायरीPoliceपोलिसArrestअटक