शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड इन्स्टिट्युटचे संस्थापक मारुती नवलेंनी केली कर्मचार्‍यांची ७० लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

By विवेक भुसे | Updated: November 29, 2023 10:49 IST

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी मारुती निवृत्ती नवले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने फटकारल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

पुणे : सिंहगड इन्स्टिट्युटचे संस्थापक मारुती नवले यांनी सिटी स्कुलच्या सव्वाशे हून कर्मचार्‍यांच्या पगारातून भविष्यनिर्वाह निधीची कपात करुन ते भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा न करता तब्बल ७० लाख ९२ हजार ८६२ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी मारुती निवृत्ती नवले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने फटकारल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधिकारी राहुल एकनाथ कोकाटे (वय ५१, रा. तुपेनगर, हडपसर) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोंढव्यातील टिळेकरनगर येथील सिंहगड सिटी स्कुलमध्ये ऑक्टोबर २०१९ ते जून २०२२ पर्यंत घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड इन्स्टिट्युटचे संस्थापक मारुती नवले यांच्या सिंहगड सिटी स्कुलमध्ये साधारण ११५ ते १३६ कर्मचारी आहेत. त्यांच्या पगारातून नवले यांनी भविष्य निर्वाह निधी म्हणून ७४ लाख ६८ हजार ६३६ रुपये एवढी कपात केली. त्यापैकी फक्त ३ लाख ७५ हजार ७७४ रुपये एवढी रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा केली. उर्वरित ७० लाख ९२ हजार ८६२ रुपये खात्यात जमा न करता स्वत:च्या फायद्यासाठी वापरुन कर्मचार्‍यांचा विश्वासघात केला.

हा प्रकार समोर आल्यानंतर भविष्य निर्वाह निधी खात्याने पोलिसांकडे तक्रार केली़ परंतु, पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला नाही. शेवटी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गुन्हा दाखल करुन घेऊन अहवाल देण्याचा आदेश दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक बाबर तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी