शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

लॉकडाऊनमध्ये संभाजी पुलावरून दिसणारा किल्ले सिंहगड अनलॉकनंतर झाला 'गायब'! जाणून घ्या कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 11:54 IST

लॉकडाऊनमध्ये एस. एम. जोशी पुलावरून किल्ले सिहंगड स्पष्ट दिसून येत होता. पण आता अनलॉकनंतर तो दिसेनासा झाला आहे.

ठळक मुद्देधुलिकणात वाढ ; कोरोनाच्या काळात धोकादायकगेल्या आठवड्यात पीएम २.५ ची पातळी १४२ वर गेली होती, जी आरोग्यासाठी धोकादायक

श्रीकिशन काळेपुणे : शहरात वाहनांची संख्या प्रचंड झाल्याने त्यातून निघणाऱ्या धुराने हवेतील पीएम २.५ धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे. लॉकडाऊनमध्ये एस. एम. जोशी पुलावरून किल्ले सिहंगड स्पष्ट दिसून येत होता. पण आता अनलॉक नंतर तो दिसेनासा झाला आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात ही स्थिती अजून गंभीर होणार आहे. गेल्या आठवड्यात पीएम २.५ ची पातळी १४२ वर गेली होती, जी आरोग्यासाठी धोकादायक आहे.

शहरात वाहनांची संख्या वाढत आहे. या दसऱ्याला काही हजार वाहने रस्त्यावर आली. त्यातून निघणाऱ्या धुराने प्रदूषणात भर घातली आहे. त्यामुळे दररोजच्या प्रदूषणाची पातळी शंभरच्या आसपास जात आहे. परिणाम हे आरोग्यासाठी घातक ठरणारे आहे.प्रदूषण कमी करायचे असेल, तर नागरिकांनी सायकलचा वापर अधिक करायला हवा. जवळच्या ठिकाणी चालत जावे. दुचाकीपेक्षा सायकल वापरल्यास आरोग्य देखील चांगले राहण्यासाठी मदत मिळते. तसेच इंधनाचा खर्चही वाचतो.

प्रदूषणाचा शरीरावर काय परिणाम?एरवी शहरात शुद्ध हवा मिळत नाही. त्यासोबत कार्बन डायऑक्साइड, धुलिकण, बॅक्टेरिया, विषाणू, विविध परागकण आपण श्वासाद्वारे शरीरात घेत असतो. जे आपल्या शरीराला हानी पोचवतात. यामुळे हृदयावर परिणाम होऊन हायपरटेंशन, हृदयाचे आजार, हृदय बंद पडणे असा धोका असतो. फुप्फुसांना इन्फेक्शन, विसराळूपणा, अस्थमा, फुप्फुसाचा कॅन्सर, स्ट्रोक, अल्झायमर असे आजार होऊ शकतात.

सध्या थंडी सुरू झाल्याने हवेतील बारीक धुलीकण बराच काळ हवेतच राहतात. ते आपल्या आरोग्याला घातक ठरतात. श्वास घेताना ते आपल्या फुप्फुसात जाऊन आजार होण्याची शक्यता असते. त्यासाठी आता प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारकच झाले आहे.- डॅा. संदीप साळवी, फुप्फुसरोग तज्ज्ञ

                         लॉकडाऊनपूर्वी -    लॉकडाऊन सुरू -       लॉकडाऊन-     अन लॉकनंतर                           १८ मार्च                  १९ मार्च                   ८ जून           ३१ ऑक्टोबरशिवाजीनगर        १४०                          ७९                         ५५                  १४२हडपसर                १२६                          ९२                         ५८                  १०८पाषाण                  ६१                           ४३                          ५६                   ५१लोहगाव               ११०                          ८०                         १०२                 ८५भोसरी                 १२३                           ९२                           ४०                १०५     पीएम २.५ हवेची गुणवत्ता पातळी०१ ते ५० पर्यंत शुध्द हवा,५० ते १०० किंचित धोका,१०० ते २०० धोकादायक हवा,२०० ते ३०० खूप धोका

टॅग्स :Puneपुणेsinhagad fortसिंहगड किल्लाpollutionप्रदूषणcorona virusकोरोना वायरस बातम्या