एकपात्री कलाकार महोत्सवास सुरुवात
By Admin | Updated: November 9, 2014 00:03 IST2014-11-09T00:03:36+5:302014-11-09T00:03:36+5:30
शहरात नाटय़गृहांची संख्या वाढली असली, तरी प्रेक्षकांअभावी ती ओस पडत चालली आहेत; त्यामुळे आगामी काळात एकपात्री कलाकारांना सुगीचे दिवस येणार आहेत,

एकपात्री कलाकार महोत्सवास सुरुवात
पुणो : शहरात नाटय़गृहांची संख्या वाढली असली, तरी प्रेक्षकांअभावी ती ओस पडत चालली आहेत; त्यामुळे आगामी काळात एकपात्री कलाकारांना सुगीचे दिवस येणार आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष सुनील महाजन यांनी केले.
पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आर्य थिएटर संस्थेच्या वतीने वेदशास्त्रोत्तेजक सभागृहात आयोजित ‘एकपात्री कलाकार महोत्सवा’च्या उद्घाटनाप्रसंगी ते प्रमुख पाहुणो म्हणून बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ एकपात्री कलावंत डॉ. मधुसूदन घाणोकर, डॉ. सुरेंद्र पटवर्धन आणि निमंत्रक डॉ. ¬चा थत्ते उपस्थित होत्या. डॉ. मधुसूदन घाणोकर यांनी, सामान्य माणसांवर भाष्य करून त्यांनी ‘माणसू’ या शब्दाला खरा अर्थ पुलंनी प्राप्त करून दिला असल्याचे नमूद केले. जयश्री बापट, विलास पोतनीस, मंदाताई नाईक, डॉ. ऋचा थत्ते आणि शारदा मुंडे यांनी एकपात्री प्रयोग सादर केले. (प्रतिनिधी)
आज नाटय़गृहांची संख्या वाढली असली तरी नाटकांना बुकिंग होत नाही. महागाईमुळे नाटय़निर्मितीचा खर्च निर्मात्यांना परवडत नाही, अशी सध्याच्या नाटकांची स्थिती आहे. त्यामुळे यापुढील काळात एकपात्री कलाकारांमुळेच रंगभूमी काही प्रमाणात तरणार असून, या कलाकारांना सुगीचे दिवस येतील.
- सुनिल महाजन