सिंगल न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:12 IST2021-03-18T04:12:30+5:302021-03-18T04:12:30+5:30

-- बारामती : बारामती तालुक्यातील भिरालवाडी एका पोकलेनमशीनचे रिलीफ वॉल चोरट्यांनी लंपास केले. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ...

Single news | सिंगल न्यूज

सिंगल न्यूज

--

बारामती : बारामती तालुक्यातील भिरालवाडी एका पोकलेनमशीनचे रिलीफ वॉल चोरट्यांनी लंपास केले. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी अशोक लक्ष्मण कोकणे यांनी फिर्याद दाखल केली.

---

खेडशिवापूरमध्ये देशीदारु विकताना एकास पकडले

--

खेडशिवापूर : खेडशिवापूर येथील शिवसुंदर हॉटेलच्या पाठीमागील मोकळ्या जागेमध्ये टँगो पंच देशी दारुच्या १८० मीलीच्या ६६ बाटल्यांची बेकायदेशीरित्या वक्रीसाठी जवळ बाळगल्याने दोघांना पोलिसांनी अटक केली. रवी चंद्र चव्हाण व तुषार उत्तम कोंडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राजगड पोलिसात गुन्हा दाखल झाला.

--

थेऊरमध्ये मटका चालविणाऱ्यास पकडले

--

लोणीकाळभोर : थेऊर (ता. हवेली) येथील बाजार मैदानातील एका पत्र्याच्या आडोशाला कल्याण मटका चालवित असल्याप्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला. दत्तात्रय बाळासो चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीसह चारशे रुपयांची रोकड, डायऱ्या, पेन आदी साहित्य जप्त केले. याबाबत लोणीकाळबोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

----

Web Title: Single news