सिंगल बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:11 IST2020-12-22T04:11:49+5:302020-12-22T04:11:49+5:30

पुणे: ज्ञानदीप महिला फाऊंडेशनच्या वतीने राजस सोसायटी येथे ग्रंथालय सुरू करण्यात आले. ग्रंथालयाचे उदघाटन फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा रेणुसे यांच्या ...

Single news | सिंगल बातम्या

सिंगल बातम्या

पुणे: ज्ञानदीप महिला फाऊंडेशनच्या वतीने राजस सोसायटी येथे ग्रंथालय सुरू करण्यात आले. ग्रंथालयाचे उदघाटन फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा रेणुसे यांच्या हस्ते झाले. या वेळी बबन कारके, सुभद्रा जाधव आदी उपस्थित होते. या परिसरातील नागरिकांनी व मुलांनी वाचन संस्कृती जोपासावी या उद्देशाने ग्रंथालय सुरू केले आहे.

युवा सेनेची मोफत आरोग्य तपासणी शिबिर

पुणे: युवा सेनेच्या वतीने मोदी गणपती चौकात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मधुमेह, संधिवात, हिमोग्लोबिन, कोलेस्टेरॉल यांची तपासणी करण्यात आली. यावेळी युवा सेनेचे कसबा प्रमुख निरंजन दाभेकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता अंकुश काकडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर राजेंद्र पंडित, डॉ. गिरीश भाटिया, योगिता रिठे आदी उपस्थित होते.

Web Title: Single news