कुंजीरवाडीतून लांबविले चांदीची भांडी व दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:11 IST2021-02-05T05:11:20+5:302021-02-05T05:11:20+5:30
याप्रकरणी ज्ञानेश्वर चंद्रकांत काळभोर (रा. लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करन्यात आला आहे. ...

कुंजीरवाडीतून लांबविले चांदीची भांडी व दुचाकी
याप्रकरणी ज्ञानेश्वर चंद्रकांत काळभोर (रा. लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करन्यात आला आहे. कुंजीरवाडी येथे काळभोर यांचे घर असुन तेथे मुलगा सुदर्शन हा अभ्यास करतो व तेथे घरातील सर्व प्रापंचिक सामान जुन्या वस्तु व चांदीचे देवाचे भांडे आहेत मुलगा व ते अधुन - मधून त्या घरी येत जात असतात. रविवार (दि २४ ) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कुंजीरवाडी येथील घराशेजारील तापकीर मावशी यांनी फोन वरून काळभोर यांना तुमचे घराचे दार चोरट्यांनी तोडून चोरी केल्याचे सांगितले. काळभोर हे पत्नी विजयासह तेथे पोहोचले व पाहणी केली. यावेळी घराचे दार तोडलेले व लोखंडी कपाट उचकटलेेले दिसले. कपाटातील ड्रॉव्हर व त्यातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटामध्ये ७५० ग्राम वजणाची जुनी चांदीचे ५ भांडी त्यामध्ये ताट, वाटी, चमचा, पळी, गडवा व १० हजारा रोख रक्कम असे कपाटामध्ये ठेवलेल्या ठिकाणी नव्हते.
त्यांनी आजुबाजुचे लोकांकडे चौकशी केली असता कुंजीरवाडी गावामध्ये रोहीत दत्तात्रय चौधरी (रा. नविन ग्रामंचायतीचे पाठीमागे ) यांची दुचाकी चोरल्याचे सांगितले.