बलात्काराच्या घटनेचा मूक निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:15 IST2021-09-08T04:15:37+5:302021-09-08T04:15:37+5:30

पुणे : शहर हादरवून सोडणाऱ्या बलात्काराच्या घटनेचा काँग्रेसच्या महिला आघाडीने मूक निषेध केला. अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याजवळ बसून अपराध्यांना ...

Silent protest of the rape incident | बलात्काराच्या घटनेचा मूक निषेध

बलात्काराच्या घटनेचा मूक निषेध

पुणे : शहर हादरवून सोडणाऱ्या बलात्काराच्या घटनेचा काँग्रेसच्या महिला आघाडीने मूक निषेध केला. अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याजवळ बसून अपराध्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

माजी आमदार दीप्ती चौधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, शहराध्यक्ष सोनाली मारणे, प्रदेश सचिव संगीता तिवारी तसेच अन्य महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी यात सहभागी झाले होते. प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील पुरुषांना स्त्रीबाबत आदरभावना ठेवायला शिकवले पाहिजे. शालेय वयापासूनच हे शिक्षण देण्याची गरज आहे. पुण्यासारख्या शहरात असे प्रकार वारंवार व्हावेत याची पुणेकर म्हणून खंत वाटते, अशी भावना सर्वच महिलांनी व्यक्त केली. गुन्हेगार सापडले आहेत, आता त्यांना कडक शिक्षा होईल याची काळजी पोलिसांनी तपास करताना घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Web Title: Silent protest of the rape incident