केंद्र सरकारविरोधात महाविकास आघाडीचे मूक आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:08 IST2021-07-23T04:08:44+5:302021-07-23T04:08:44+5:30
पुणे : इस्त्राईलच्या खाजगी कंपनीचे सॉफ्टवेअर वापरून देशातील नेत्यांवर, न्यायाधीशांवर, अधिकाऱ्यांसह पत्रकारांवरही केंद्र सरकारने पाळत ठेवण्याचे गंभीर प्रकरण उघडकीस ...

केंद्र सरकारविरोधात महाविकास आघाडीचे मूक आंदोलन
पुणे : इस्त्राईलच्या खाजगी कंपनीचे सॉफ्टवेअर वापरून देशातील नेत्यांवर, न्यायाधीशांवर, अधिकाऱ्यांसह पत्रकारांवरही केंद्र सरकारने पाळत ठेवण्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या हुकूमशाहीचा विरोध करण्यासाठी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या तीनही पक्षांच्या वतीने गांधी भवन कोथरूड येथे मूक आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या या हुकूमशाही कारभाराला रोखण्यासाठी आता देशातील सर्व नागरिकांनी एकजूट होण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले़ या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे, दिपाली धुमाळ, राजलक्ष्मी भोसले, शाम देशपांडे, विकास दांगट, संतोष ढोक, ज्योती सुर्यवंशी, आनंद तांबे आदी उपस्थित होते़ आंदोलनाचे प्रास्ताविक प्रदीप देशमुख यांनी केले तर आभार मोहन जोशी यांनी मानले.
------------------
फोटो मेल केला आहे.