शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील सिग्नल सिंक्रोनाईज होणे आवश्यक : डॉ. के. व्यंकटेशम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 17:50 IST

डॉ. व्यंकटेशम यांची अपर पोलीस महासंचालक विशेष अभियानपदी बदली झाली आहे.

ठळक मुद्देशहरात सध्या एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळ ही मोठी समस्या ‘सेवा अ‍ॅप’तसेच तडीपार गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी ‘एक्सट्रा अ‍ॅप’ राज्यभर राबवला जाणार

 पुणे : शहरात सध्या एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळ ही मोठी समस्या आहे. त्यासाठी शहरातील सिग्नल सिंक्रोनाईज होणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटीने हे काम हाती घेतले आहे. ते पूर्ण झाल्यावर लोकांचा प्रवासातील वेळ कमी होऊ शकेल, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी व्यक्त केले.डॉ. व्यंकटेशम यांची अपर पोलीस महासंचालक विशेष अभियानपदी बदली झाली आहे. त्यानिमित्त त्यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पुण्यातील आपल्या २ वर्षाच्या कार्यकाळाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आपण तीन मुद्देसमोर ठेवून काम केले. हट्टी आशावाद, विपुलतेची मानसिकता आणि निरंतर सहकार्याची भावना घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला हे खात्याअंतर्गत राबविले. त्याचा परिणाम चांगला होऊन सर्वांची कामाकडे पाहण्याची मानसिकता बदलण्यास सहाय्यभूत ठरले. अधिकार्‍यांप्रमाणेच सर्व पोलीस कर्मचार्‍यांना भावनिक प्रज्ञावंत हे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यातून पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यास मदत झाली.

लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कामांपैकी ९० टक्के कामे ही पोलिसांची नव्हती. त्यावेळी एका पोलीस कर्मचार्‍याने सांगितले की, ‘‘आता नाही करायचे तर कधी करायचे़’’ त्यातूनच कोरोना काळात पोलिसांनी सर्व बाबी बाजूला ठेवून कायद्याची अंमलबजावणी केली.शहरातील प्रत्येक प्राणघातक अपघाताचा वरिष्ठ पातळीवर अभ्यास करण्यात आला. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या बाबींतील दोष दूर करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्यासाठी सातत्याने महापालिकेशी अधिकारी समन्वय साधत असतात.  आता प्रत्येकाचा काम करण्याचा वेग वेगवेगळा असतो, असे त्यांनी सांगितले.

पुण्यात सुरु केलेले ‘सेवा अ‍ॅप’,  तसेच तडीपार गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी ‘एक्सट्रा अ‍ॅप’ आता राज्यभर राबविला जाणार आहे. राज्यभरातून पुण्यात शिक्षणासाठी येणार्‍या पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांच्या मुलामुलींसाठी वसतीगृहाची सोय करण्यात आली. पोलिसांसाठी ५ इमारतींपैकी २ इमारतींचे काम लवकरच पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे उपस्थित होते.......पुणेकरांमुळे मराठी सुधारलीसमाज माध्यमात मेसेज टाकल्यावर अनेक जण त्याचा प्रतिसाद देतात. त्याचबरोबर तुमच्या चुकाही दाखवितात. तुमची ही वेलांटी चुकली, ती अशी पाहिजे होती, असे सांगतात. त्याचबरोबर एखादी चुक झाली असली तरी त्यामागील प्रामाणिकतेची भावना पुणेकर जाणतात. चुक दुरुस्ती केल्यावर मोठ्या मनाने स्तुतीही करतात.इतर शहरात ११ सुचना येत होत्या. पुण्यात पहिल्यावेळीच तब्बल ८११ सुचना आल्या होत्या. पुणेकरांच्या प्रतिसादामुळे काम करायला हुरुप आला. पुणेकरांमुळे माझी मराठी सुधारली, असे डॉ. व्यंकटेशम यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसTransferबदलीcommissionerआयुक्त