चिंचवडला सप्तसुरांचा नजराणा

By Admin | Updated: October 29, 2016 04:26 IST2016-10-29T04:26:41+5:302016-10-29T04:26:41+5:30

लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळविणारा सण म्हणजेच दिवाळी. सुख, समृद्धी, आनंदाची पखरण करणारा उत्सव. अशा चैतन्यमयी वातावरणात दिवाळीचा गोडवा वाढविण्याचा

Sightseeing of Chinchwad | चिंचवडला सप्तसुरांचा नजराणा

चिंचवडला सप्तसुरांचा नजराणा

पिंपरी : लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळविणारा सण म्हणजेच दिवाळी. सुख, समृद्धी, आनंदाची पखरण करणारा उत्सव. अशा चैतन्यमयी वातावरणात दिवाळीचा गोडवा वाढविण्याचा प्रयत्न लोकमत वृत्तपत्र समूहाने केला आहे. सुरेल आनंदाची पर्वणी अर्थात दिवाळी पाडवा पहाट मैफलीचे पिंपरी-चिंचवड
शहरात प्रथमच केले आहे. जय मातृभूमी युवा मंच आणि राहुल कन्स्ट्रक्शन्स यांच्या सहयोगाने स्वरचैतन्य हा कार्यक्रम सोमवार, दि. ३१ आॅक्टोबरला होणार आहे
दिवाळीत सूर, लय आणि ताल यांच्या अद्वितीय आविष्काराची सुरेल मेजवानी रसिकांना अनुभवयास मिळणार आहे. शास्त्रीय, सुगम आणि फ्युजनचा अनोखा नजराणा पेश होणार आहे. त्यात प्रसिद्ध शास्त्रीय गायक जयतीर्थ मेवुंडी, पंडीत जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य शौनक अभिषेकी, प्रसिद्ध युवा गायिका सावनी शेंडे आदी गायन सादर करणार असून त्यांना प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक, अनय गाडगीळ (सिंथेसायझर), ओंकार दळवी (पखवाजवादक), तन्मय देवचके (हार्मोनियमवादक), हर्षद कानिटकर (तबलावादक), अभिजित भदे (ड्रम्स) साथ करणार आहेत. प्रसिद्ध निवेदक आनंद देशमुख निवेदन करणार आहेत. या कार्यक्रमाचे सहयोगी प्रायोजक मँगो हॉलिडेज, ऐश्वर्यम कोर्टयार्ड हे आहेत. तसेच ‘आयबीएन लोकमत’ या कार्यक्रमाचे टेलिव्हिजन पार्टनर आहेत. तसेच स्वीट पार्टनर काका हलवाई, गायत्री पैठणी सील्क सारीज्, द्वारकादास श्यामकुमार यांचे सहकार्य आहे. हा कार्यक्रम विनामुल्य असला तरी प्रवेशिका असणे आवश्यक आहे.
लोकमत कार्यालयासह
विविध ठिकाणी प्रवेशिका
उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वरमयी दिवाळी पहाटेस उपस्थित राहूल आनंदोत्सवात भर टाकावी, दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन लोकमत परिवारातर्फे केले आहे.(प्रतिनिधी)

प्रवेश विनामूल्य
लोकमत सखी मंच सभासद, त्यांच्या कुटुंबीयांसमवेत, वाचकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे.
चिंचवड येथील तानाजीनगर काकडे पार्क येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल प्रशस्त मैदानावर पहाटे ५.३० वा. हा कार्यक्रम होईल.

कसे पोहोचावे?
चिंचवडगावातून लिंक रस्त्याने काकडे पार्क, काळेवाडी पुलावरून केशवनगरमार्गे काकडे पार्क, पिंपरीतील उड्डाणपुलावरून लिंक रस्त्त्याने तानाजीनगरातील मैदानावर पोहोचता येणार आहे.

Web Title: Sightseeing of Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.