चोरटे २४ तासांत जेरबंद

By Admin | Updated: December 24, 2016 00:15 IST2016-12-24T00:15:55+5:302016-12-24T00:15:55+5:30

एसटी स्थानकात गर्दीचा फायदा घेऊन अकलूज (ता. माळशिरस) येथील महिलेच्या गळ्यातील गंठण चोरून नेलेल्या सराईत

Sieves seized in 24 hours | चोरटे २४ तासांत जेरबंद

चोरटे २४ तासांत जेरबंद

बारामती : एसटी स्थानकात गर्दीचा फायदा घेऊन अकलूज (ता. माळशिरस) येथील महिलेच्या गळ्यातील गंठण चोरून नेलेल्या सराईत आरोपींना २४ तासांच्या आत गुन्हेशोध पथकाने ताब्यात घेतले. वेगवेगळ्या गुन्ह्यातील चौघा सराईतांना अटक केली.
बाबासाहेब गायकवाड (रा. वेळी, जि. नगर), कृष्णा गायकवाड (रा. औरंगपुरा, जि. बीड) यांना ताब्यात घेतले. मंदाकिनी महादेव बनसोडे (रा. अकलूज) या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हस्तगत केले. सचिन राजू जव्हारे (वय २३, रा. वडकेनगर, बारामती) याला पाण्याची मोटर चोरी प्रकरणी अटक केली. याशिवाय गुरुवारी मंडईत आठवडेबाजाराच्या गर्दीत ग्राहकांचे मोबाईल चोरणारा आरोपी सवरवरीलाल सरदार शिलारे (वय ४८, रा. गोटण्या, ता. धनर्डे, जि. हरदा, मध्य प्रदेश) यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरलेले मोबाईल जप्त करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक सुनील गायकवाड, नीलेश अपसुंदे, हवालदार अनिल काळे, पोलीस नाईक रमेश केकाण, सुहास लाटणे, विजय वाघमोडे, रूपेश साळुंके, दादा डोईफोडे, राजेंद्र गायकवाड, ओंकार सिताप, पोपट नाळे, सिद्धेश पाटील या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Sieves seized in 24 hours