साईडपट्ट्या खोदल्या
By Admin | Updated: April 29, 2017 03:58 IST2017-04-29T03:58:00+5:302017-04-29T03:58:00+5:30
भामा-आसखेड धरणावरून पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात येत असलेलली जलवाहिनी अगदी डांबरी रस्त्यालगत टाकली जात आहे.

साईडपट्ट्या खोदल्या
आंबेठाण : भामा-आसखेड धरणावरून पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात येत असलेलली जलवाहिनी अगदी डांबरी रस्त्यालगत टाकली जात आहे. त्यासाठी नियम पायदळी तुडवून रस्त्याच्या साईडपट्ट्या खोदल्या जात आहेत. याशिवाय मुख्य वर्दळीचा रस्ता अडविला गेल्याने संताप व्यक्त होत आहे.
भांबोली व सावरदरी रस्त्यावरील असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ ही खोदाई सुरू आहे. ठेकेदाराने एमआयडीसीच्या रस्त्यांचे सर्व नियम पायदळी तुडवत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरूच ठेवले आहे. खोदाई करण्यासाठी पोकलेन मशिनरी वापरली जात असून त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच बनविलेल्या रस्त्याच्या चक्क साईडपट्ट्याच खोदल्या आहेत.
तीव्र वळणाच्या ठिकाणीच वाहतूक एका बाजूने बंद करून एकाच लेनवरून येणारी आणि जाणारी वाहने काढून दिली जात आहे. त्यामुळे नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे.
भांबोली व सावरदरी येथील एमआयडीसीच्या रस्त्याच्या कडेने टाकण्यात येत असलेल्या या जलवाहिनीचे काम एल अँड
टी कंपनीने तर धरणापासून चिंबळीफाटापर्यंतचे काम उपठेकेदार म्हणून सोनन इंजिनिअरिंग (पुणे)
या कंपनीला दिले आहे. अनेक ठिकाणी रस्ता क्रॉसिंग करून जलवाहिनी टाकली असून तो खोदाई केलेला रस्ता पुन्हा पूर्ववत न करता त्याच अवस्थेत ठेवला जात आहे. खोदलेले रस्ते तसेच ठेवल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. (वार्ताहर)