प्रिमिअर लीग स्पर्धे सिध्दीविनायक वारियर्स संघ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:09 IST2021-03-30T04:09:16+5:302021-03-30T04:09:16+5:30

धावडी- बाजारावाडी येथील श्री काळभैरवनाथ, श्री जानुबाई देवीच्या यात्रेनिमित्त प्रिमियर लिग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वारियर्स स्पर्धेत ...

Siddhivinayak Warriors team first in Premier League competitions | प्रिमिअर लीग स्पर्धे सिध्दीविनायक वारियर्स संघ प्रथम

प्रिमिअर लीग स्पर्धे सिध्दीविनायक वारियर्स संघ प्रथम

धावडी- बाजारावाडी येथील श्री काळभैरवनाथ, श्री जानुबाई देवीच्या यात्रेनिमित्त प्रिमियर लिग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वारियर्स स्पर्धेत १२ क्रिकेट संघानी सहभाग घेतला होता.

यामध्ये संघमालक किसन हवालदार यांच्या सिध्दीविनायक वारियर्स (प्रथम), संघमालक संदिप जाधव - हनुमंत साप्ते यांचा रोहिडा योध्दा (द्वितीय), संघमालक सचिन शिंदे, संदिप शिंदे यांचा गणराज वारियर्स ( तृतीय ) तर संघमालक तेजस चव्हाण यांची मुरदादेवी वारियर्स या संघाने उत्तेजनार्थ क्रमांकाचे बक्षिस मिळवले.

यावेळी ज्ञानेश्वर राऊत, मोहन गुरव, उत्तम खोपडे, चंद्रकांत जाधव, अर्जुन खोपडे यांच्या हस्ते विजेत्या संघाना रोख रक्कम चषक देण्यात आले. यावेळी सुरेश राऊत, संजय राऊत माऊली शिंदे, गोरख मानकर, अकुंश वाघ, संजय मानकर, अजिंक्य शिंदे, अमोल खोपडे, सागर मांढरे, माऊली राऊत, सोमनाथ फाटक उपस्थित होते.

--

२९ भोर प्रिमियर लीग

धावडी - बाजारवाडी प्रिमियल लीग स्पर्धेत विजेता संघ सिध्दिविनायक वारियर्स फोटो

Web Title: Siddhivinayak Warriors team first in Premier League competitions