आडत्यांचा बंद, महागाई शिगेला

By Admin | Updated: June 6, 2014 23:33 IST2014-06-06T21:44:14+5:302014-06-06T23:33:33+5:30

आडते असोसिएशनचा बेमुदत बंद सलग तिसर्‍या दिवशी कायम राहिल्याने किरकोळ बाजारात विक्रेते ठरवतील त्या किंमतीला भाजी घेण्याची वेळ खरेदीरांवर आली.

Shutdown closed, inflation rose | आडत्यांचा बंद, महागाई शिगेला

आडत्यांचा बंद, महागाई शिगेला

मार्केट यार्डात ६७ लाखांची उलाढाल, शेतकर्‍यांना मिळाला भाव

पुणे : आडते असोसिएशनचा बेमुदत बंद सलग तिसर्‍या दिवशी कायम राहिल्याने किरकोळ बाजारात विक्रेते ठरवतील त्या किंमतीला भाजी घेण्याची वेळ खरेदीरांवर आली. बाजारात फळभाज्यांचे प्रतिकिलेचे भाव ३० ते ६० रुपयांदरम्यान आहेत. तर घेवडा १५०, हिरवी मिरची ६० व दोडका ६५, सिमला मिरचीचा भाव ८५ रुपये किलोवर पोहचला आहे.
हमालीची टोळी पद्धत रद्द करावी या मागणीसाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनने बेमुदत बंद पुकारला आहे. पणन संचालकांनी केलेल्या आवाहनानुसार शेतकर्‍यांनी तब्बल ३ हजार ९४७ क्विंटल भाजीपाला बाजारात आणला. बाजारात दररोज १५० ते २०० गाड्या भाजी व फळांची आवक होते. त्या तुलनेत शुक्रवारी केवळ १७ टेम्पो व ८० लहान टेम्पो भाजी व फळांची आवक झाली. मात्र मागणी वाढल्याने सर्वच भाज्यांना चांगले दर मिळाले. त्यामुळे आवक कमी होऊनही बाजारात तब्बल ६७ लाखांची उलाढाल झाली.
किरकोळ भाजी विक्रेते सचिन काळे म्हणाले, मार्केट यार्डात तुरळक आवक होत असली तरी मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने घाऊक बाजारातच भाज्यांचे भाव वाढलेले होते. सध्या हडपसर व चंदननगर येथील मार्केट मधून भाज्यांची खरेदी केली जात आहे. मात्र मागणीच्या तुलनेत तेथील आवकही तटपुंजीच आहे. त्यामुळे मर्यादित स्वरुपात भाजी मिळत असल्याने किरकोळ बाजारातील व्यापार्‍यांच्या दरातही मोठी तफावत दिसून येत आहे. बंदमुळे अनेक ठिकाणी विक्रेते मनाप्रमाणेच दर आकारत आहेत.
मार्केट यार्डातील भाज्यांचे दहा किलोचे घाऊक दर (कंसात किरकोळ बाजारातील प्रतिकिलोचे दर) : कांदा १२०-२०० (३०), बटाटा २५० (३५), भेंडी २५०-३०० (३५-४०), गवार ३००-४०० (५०-६०), काकडी ८०-२०० (४५-५०), टोमॅटो ७०-१२० (२०), फ्लॉवर ८०-१०० (५५), घेवडा ७००-११०० (१५०), दोडका ३००-४०० (५०-६५), हिरवी मिरची ४००-५०० (६०), दुधी भोपळा ८०-१२० (५०).
भाजीपाला (शंभर जुडीचा घाऊक दर व कंसात एका जुडीचा दर) - कोथिंबीर ४००-११०० (२५), मेथी ७००-१२०० (२५), शेपू ८००-१००० (२०).

 

Web Title: Shutdown closed, inflation rose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.