महापालिकेत शुकशुकाट
By Admin | Updated: September 17, 2014 00:38 IST2014-09-17T00:38:37+5:302014-09-17T00:38:37+5:30
एरवी गर्दीने फुलून जाणा:या महापालिकेत चार दिवसांपासून शुकशुकाट दिसू लागला आहे.

महापालिकेत शुकशुकाट
पिंपरी : एरवी गर्दीने फुलून जाणा:या महापालिकेत चार दिवसांपासून शुकशुकाट दिसू लागला आहे. महापालिका आवारात वाहने लावण्यास जागा पुरी पडत नसल्याने पुणो-मुंबई महामार्गावर पर्यायी जागा शोधून वाहने लावण्याची वेळ येते. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होताच, आता महापालिकेच्या आवारातील वाहनतळावरील वाहनांची गर्दी कमी झाली; तसेच कार्यकर्ते, पदाधिका:यांची वर्दळसुद्धा कमी झाल्याने शुकशुकाट दिसून येऊ लागला आहे. विशेष म्हणजे मंगळवारी स्थायी समितीची साप्ताहिक सभा असूनही शुकशुकाट असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
शुक्रवारी, 12 सप्टेंबरला महापालिकेत महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या दिवसार्पयत कार्यकर्ते, पदाधिका:यांची वर्दळ पहावयास मिळाली. त्यानंतर दुस:याच दिवसापासून कार्यकर्ते, पदाधिका:यांनी महापालिकेकडे पाठ फिरवली आहे. महापालिका प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या, दुस:या आणि तिस:या मजल्यावर नेहमीच वर्दळ असते. तेथील महापौर, उपमहापौर, पक्षनेते, विरोधी पक्षनेते, तसेच विविध विषय समिती पदाधिका:यांच्या कक्षात दिवसभर कार्यकत्र्याचा वावर असतो. पदाधिका:यांचे कक्षसुद्धा कार्यकत्र्याच्या गर्दीने फुलून गेलेले असताना स्थायी समिती साप्ताहिक सभेच्या वेळी तर मंगळवारी तिस:या मजल्यावर आठवडा बाजारासारखे चित्र दिसून येते. या दिवशी पालिकेत मोठय़ा संख्येने ठेकेदारही निदर्शनास येतात. आचारसंहिता लागू झाल्यानंतर मात्र स्थायी समितीकडेही कोणीही फिरकताना आढळून येत नाही.
निवडणूक कामकाजासाठी कर्मचा:यांची नियुक्ती केली असल्याने विविध विभागांमध्ये अधिकारी, कर्मचारीही आढळून येत नाहीत. कधी आचारसंहिता, तर कधी अधिकारी नाहीत, अशी कारणो पुढे केली जात असल्याने नागरिकांनाही कामासाठी हेलपाटे मारावे लागतात.(प्रतिनिधी)
4बांधकाम परवाना आणि नगररचना विभाग वगळता अन्य विभागात कोणीही नागरिक फिरकत नाही. एलबीटी, वैद्यकीय विभाग, शिक्षण मंडळ, संगणक, करसंकलन, पाणीपुरवठा या सर्वच विभागांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. ही परिस्थिती महिनाभर राहणार आहे.
4निवडणूक होईर्पयत कोणतीच कामे होणार नाहीत अशी मनाची समजूत करून नागरिकसुद्धा आता महापालिकेत येण्याचे टाळत आहेत. पदाधिका:यांच्या कक्षाजवळ एखाद-दुसराच कर्मचारी असतो. अशीच स्थिती विविध पदाधिका:यांच्या दालनासमोर दिसून येऊ लागली आहे. महापालिकेत नागरिक आणि कार्यकत्र्याचाही ओघ कमी झाला आहे. कामे होत नाहीत म्हणून नागरिक येण्याचे बंद झाले आहे, तर कार्यकर्ते उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय झाले असल्याने महापालिकेत येत नाहीत.