बारामती शहरात सर्वत्र शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:10 IST2021-04-11T04:10:51+5:302021-04-11T04:10:51+5:30
उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत बंद सेवा व्यवसायबाबत नागरीकांना सोशल मीडियावर संवाद साधत माहिती ...

बारामती शहरात सर्वत्र शुकशुकाट
उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत बंद सेवा व्यवसायबाबत नागरीकांना सोशल मीडियावर संवाद साधत माहिती दिली. शहरात आज त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. नागरिकांनी देखील शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरीच थांबणे पसंत केले.
बारामती शहरात कोरोना रुग्णसंख्येने आजपर्यंत ११ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे धास्तावलेल्या बारामतीकरांना कोरोनामुक्त होण्यासाठी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची गरज आहे. त्याप्रमाणे आज बारामतीकरांनी प्रतिसाद दिल्याचे पहावयास मिळाले. प्रत्येक चौकात पोलीस बंदोबस्त होता. सर्व रस्ते, व्यापार पेठा ओस पडल्याचे चित्र होते. या मिनी लॉकडाऊन बाबत शहरातील व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत दोन दिवस पाठिंबा दिला आहे.
मात्र, सोमवारपासुन दुकाने उघडण्याचा पवित्रा घेत एल्गार पुकारला आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत बारामती शहर आणि तालुक्यात एकूण २०७ कोरोनाबाधित आढळले. यामध्ये शहरातील १११, तर ग्रामीणमधील ९६ रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत ११ हजार ४१५ रुग्ण आढळले आहेत. तर आजपर्यंत एकूण १७८ जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.
—————————————————————
रेमडेसिविर इजेक्शनचा तुटवडा
शहरातील सरकारी रुग्णालय, खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांना जागा नसल्याचे वास्तव आहे. शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठा तुटवडा आहे. त्यामुळे कोरोना इंजेक्शनचा पुरवठा पूर्ववत होईपर्यंत कोरोना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक धास्तावलेलेच राहणार असल्याचे भयानक वास्तव आहे. शहरात आरोग्याबाबत प्रथमच आणीबाणीची वेळ आली आहे.
————————————————