शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कार्यालयांमध्ये बंदमुळे शुकशुकाट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 03:35 IST

कोरेगाव भीमा येथे दोन गटांत झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी बंद पुकारण्यात आल्यानंतर गुरुवारी पुण्यातील जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.

पुणे  - कोरेगाव भीमा येथे दोन गटांत झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी बंद पुकारण्यात आल्यानंतर गुरुवारी पुण्यातील जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसह नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये नागरिक फिरकलेच नाहीत. तर, बहुतांश जणांना येता आले नाही. अनेक कार्यालयांमध्ये तर कर्मचाºयांनी ‘दांडी’ मारल्याचे चित्र होते. तर, अनेक कार्यालयांमधून महिलांना लवकर सोडण्यात आले होते.बंदच्या काळात सरकारी कार्यालये लक्ष्य केली जाण्याची शक्यता होती. त्यामुळे या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मध्यवर्ती इमारतीमधील सहकार, कृषी, शिक्षण या विभागांची आयुक्तालये, कारागृह, अन्नधान्य वितरण कार्यालय, नगररचना, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, जनसंपर्क कार्यालये, पणन विभाग आदी प्रमुख कार्यालयांमध्ये गुरुवारी अभावानेच नागरिक आलेले दिसत होते. बºयाच कार्यालयांमधील कर्मचारी सुटीवर गेल्याचेही दिसले.तर, नवीन प्रशासकीय इमारतीधील नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे कार्यालय, राज्य माहिती आयुक्तालय, जमाबंदी आयुक्तालय; तसेच भूमी अभिलेख, राष्ट्रीय हरित न्यायालय, महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळ आदी विभागांची कार्यालयेही ओस पडली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर काही आंदोलकांनी ठिय्या दिल्याने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. इमारतीचे प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले होते. नागरिकांची चौकशी आणि तपासणी करूनच इमारतीमध्ये प्रवेश दिला जात होता. येथेही सरकारी कर्मचाºयांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे गुरुवारी सरकारी कार्यालयांमध्ये अघोषित सुटी असल्यासारखी स्थिती निर्माण झाली.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद