लक्ष्मण जगतापांच्या गडात श्रीरंग बारणे आघाडीवर

By Admin | Updated: May 23, 2014 04:54 IST2014-05-23T04:54:31+5:302014-05-23T04:54:31+5:30

सांगवी भागात आमदार लक्ष्मण जगताप यांच्यापेक्षा श्रीरंग बारणे यांनी सर्वाधिक मते मिळविली. बालेकिल्ला थेरगावातून विक्रमी २१ हजार ३९५ मते घेण्यात ते यशस्वी ठरले.

Shrirang Barane leads the road to Laxman Jagtap | लक्ष्मण जगतापांच्या गडात श्रीरंग बारणे आघाडीवर

लक्ष्मण जगतापांच्या गडात श्रीरंग बारणे आघाडीवर

पिंपरी : सांगवी भागात आमदार लक्ष्मण जगताप यांच्यापेक्षा श्रीरंग बारणे यांनी सर्वाधिक मते मिळविली. बालेकिल्ला थेरगावातून विक्रमी २१ हजार ३९५ मते घेण्यात ते यशस्वी ठरले. बारणे यांनी सांगवी भागातून जगताप यांच्यापेक्षा २ हजार ८२५ अधिक मते घेतली. मावळ लोकसभेची केंद्रनिहाय मतमोजणीची आकडेवारी ‘लोकमत’ला उपलब्ध झाली. त्यानुसार कोणत्या भागात कोणाला मतदान झाले, हे स्पष्ट झाले आहे. बारणे व जगताप हे दोघे चिंचवड विधानसभा मतदारसंघांतील उमेदवार होते. त्याचा मतदारसंघात अधिक प्रभाव आहे. दोघांच्या प्रभाव क्षेत्र असलेल्या भागातून किती मतदान कोणाला झाले, याची उत्सुकता नागरिकांना लागून राहिली होती. सांगवी, पिंपळे गुरव या भागात जगताप यांचा प्रभाव आहे. असे असतानाही बारणे यांनी सांगवी भागातून जगताप यांच्यापेक्षा २ हजार ८२५ अधिक मते घेत आश्चर्याचा धक्का दिला. बारणे यांना ९ हजार १४६ मते मिळाली, तर जगतापांना ६ हजार ३२१ इतकी मते मिळाली. राष्टÑवादीचे राहुल नार्वेकर यांना केवळ १ हजार ५७७ मते खेचता आली. पिंपळे गुरव भाग मात्र जगतापांनी राखला. २२ हजार ६०१ मते घेत त्यांनी बारणे यांच्यापेक्षा १३ हजार ३६८ मते अधिक घेतली. मात्र, बारणेंनी ९ हजार २३३ मते मिळविण्यात यश मिळविले. नार्वेकरांना ७६५ मतांवर समाधान मानावे लागले. (प्रतिनिधी)

Web Title: Shrirang Barane leads the road to Laxman Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.