जागतिक योगा स्पर्धेत श्रेया कंधारेला २ सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:14 IST2017-08-04T03:14:41+5:302017-08-04T03:14:41+5:30

सिंगापूर येथे झालेल्या सातव्या एशियन योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कोंढवळे (ता. मुळशी) येथील श्रेया कंधारे हिने १६ वर्ष वयोगटात दोन सुवर्णपदके पटकावित भारताचा तिरंगा जगात उंचावला आहे.

 Shreya Kandharela 2 gold in World Yoga Championship | जागतिक योगा स्पर्धेत श्रेया कंधारेला २ सुवर्ण

जागतिक योगा स्पर्धेत श्रेया कंधारेला २ सुवर्ण

पौड : सिंगापूर येथे झालेल्या सातव्या एशियन योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कोंढवळे (ता. मुळशी) येथील श्रेया कंधारे हिने १६ वर्ष वयोगटात दोन सुवर्णपदके पटकावित भारताचा तिरंगा जगात उंचावला आहे. आठ देशांतील दोनशेपेक्षा जास्त योगापटूंना नमवत श्रेयाने ही जिगरबाज कामगिरी केली असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
श्रेया ही पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आकुर्डी येथील म्हाळसाकांत विद्यालयात इयत्ता बारावी कला शाखेत शिकते.
तालुकापातळीवर अव्वल यश मिळवित श्रेया थेट राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरही पोचली. ५ वर्षांत तिने महाराष्ट्राला ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि ८ कांस्यपदके मिळवून दिली. याचबरोबर मलेशियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत तिने भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते.

Web Title:  Shreya Kandharela 2 gold in World Yoga Championship