शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

श्रींचे अश्व अलंकापुरीत दाखल ; माउली मंदिरात अश्वांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 20:44 IST

माउलीचे पालखी सोहळ्यातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रीचे अश्व अंकली बेळगाव येथून निघाल्यानंतर ११ दिवसांचा प्रवास करून अलंकापुरीत हरिनाम गजरात दाखल झाले.

आळंदी : माउलीचे पालखी सोहळ्यातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रीचे अश्व अंकली बेळगाव येथून निघाल्यानंतर ११ दिवसांचा प्रवास करून अलंकापुरीत हरिनाम गजरात दाखल झाले.पालखी सोहळ्यातील परंपरा प्रमाणे अश्वांचे आळंदी संस्थांचे वतीने स्वागत करण्यात आले. 

     श्रींचे अश्वाचें अंकली (ता.चिकोडी,बेळगावी,कर्नाटक) येथील राजवाड्यातून सोमवारी ( दि.२५ ) जूनला श्रींचे अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान झाले होते .११ दिवसांचे प्रवासा नंतर अश्वाचें प्रथम येथील श्रीगोपाळकृष्ण मंदिर बिडकर वाड्यात विसावले.येथे हरप्रीतसिंग बिडकर सरदार,उमेश बिडकर आणि बिडकर परिवार यांचे तर्फे पूजा स्वागत करण्यात आले. बिडकर वाड्यातील विश्रांती विसाव्या दरम्यान माउलीचे मंदिरात अश्व आळंदी समीप आल्याचा  निरोप मिळताच श्री गुरुहैबतरावबाबा यांचे दिंडीने प्रथा परंपरेने अश्वांचे स्वागत पूजा केली.यावेळी अश्व सेवेचे मानकरी उर्जितसिंह शितोळे सरदार,बाबाराजे शितोळे सरकार,आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक,पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील,विश्वस्त अजित कुलकर्णी,श्रींचे सेवक चोपदार राजाभाऊ रंधवे,रामभाऊ रंधवे,मानकरी बाळासाहेब कु-हाडे,शिवाजी भोसले,योगेश आरु,राजाभाऊ चौधरी,स्वामी सुभाष महाराज ,माजी व्यवस्थापक बंडोपंत कुलकर्णी,कर्णा सेवेचे मानकरी बल्लाळेश्वर वाघमारे,माउली निंबाळकर आदीसह भाविक,वारकरी उपस्थित होते.

     सनईचे वादनात,हरीनाम गजर आणि भाविकांची अश्व दर्शनास गर्दी केली होती.अश्व माउली मंदिरात आले.पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी श्रींचे अश्वांचे स्वागत केले.आळंदी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर कारंजा मंडपात सोहळ्यासह संस्थानचे वतीने अश्व पूजा झाली.मानकरी यांना नारळप्रसाद देण्यात आला.अश्व पूजे नंतर अश्व येथील फुलवाले समाज धर्मशाळेत मुक्कामी पोहचले.दरम्यान रात्री मंदिरात गुरुवारची श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा नंतर आरती झाली.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी अंकलीकर राजवाड्यात जावून अश्व प्रस्थान सोहळा अनुभवला .यावेळी श्रींचे पालखी सोहळ्यात महानैवेद्याचे मानकरी श्रीमंत उर्जीतसिंह शितोळे सरकार यांचे कडे श्रींचे सोहळ्यात महानैवेद्य ठेवण्यासाठी येथील श्रींचे सोहळ्यातील अब्दागिरी सेवेचे मानकरी योगेश आरू यांनी भेट दिलेला वैभवी चांदीचा चौरंग आणि पाट सरकार यांचे कडे सन्मान पूर्वक मालक बाळासाहेब आरफळकर यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीnewsबातम्या