शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भीमाशंकरला आजपासून श्रावणोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 01:40 IST

श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग असून दरवर्षी श्रावण महिन्यात दर्शनासाठी व पावसाळी पर्यटनासाठी मोठी गर्दी होते.

भीमाशंकर - श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग असून दरवर्षी श्रावण महिन्यात दर्शनासाठी व पावसाळी पर्यटनासाठी मोठी गर्दी होते. यावर्षी रविवारपासून (दि. १२) श्रावण महिना सुरू झाला असून या पहिल्याच रविवारी भीमाशंकरला दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. पाऊस आणि दाट धुक्यात भाविकांनीतासन्तास दर्शनरांगेत उभे राहून दर्शन घेतले होते. मोठ्या प्रमाणात भाविक आल्याने सुमारे चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. उद्या श्रावणाचा पहिला सोमवार असल्याने भाविकांची येणारी संख्या बघता चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.उद्यापासून श्रावणोत्सव सुरू होत आहे. पहिला श्रावण सोमवार असल्याने मोठ्या प्रमाणात भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता प्रशासनातर्फे चोख व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी दि. २०, २७ आॅगस्ट व ३ सप्टेंबर असे पुढील तीन श्रावण सोमवार आले आहेत. पहिल्याच रविवार झालेली गर्दी पाहता यावर्षी संपूर्ण श्रावण महिना भीमाशंकरला भाविकांची प्रचंड गर्दी राहणार, असे दिसते. जिल्ह्यात इतरत्र पाऊस नसला तरी भीमाशंकरमध्ये दाट धुके व मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे भीमाशंकरला पर्यटकांचा लोंढा वाढत आहे.श्रावणी सोमवार यात्रेसाठी घोडेगाव व राजगुरुनगर पोलीस ठाण्यातर्फे चोख पोलीस बंदोबस्त नेमला आहे. सोमवारप्रमाणेच शनिवार व रविवारीदेखील जादा पोलीस नेमण्यात आले आहेत. घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व बंदोबस्त नेमण्यात आला आहे. श्रावणी सोमवार यात्रेसाठी एसटी महामंडळाने पुण्यातून जादा गाड्या ठेवल्या आहेत. तसेच विविध आगारांतूनही जादा गाड्या येत आहेत. देवस्थाननेही यात्रेनिमित्त तयार केली असून यात्रेकरूंना रांगेत जास्त वेळ उभे राहावे लागू नये, यासाठी कळस दर्शनाची व्यवस्था केली आहे.धुके आणि पावसात घेतले भाविकांनी दर्शन...श्रावणी सोमवारी मंदिरात जास्त गर्दी राहू नये, दर्शन लवकरात लवकर व्हावे, यासाठी सकाळी ८ ते सायं. ५ वाजेपर्यंत मंदिरातील अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय मंदिरातील पुजाºयांनी घेतला आहे.वाहनतळ ते मंदिर या वाहतुकीसाठी यावर्षी एसटी महामंडळाने मिनीबस न दिल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. दोन मोठ्या एसटी गाड्या निगडाळे ते भीमाशंकरदरम्यान एकाच वेळेत जाऊ शकत नसल्याने या मार्गावर मिनीबसची गरज असते.मिनीबस नसल्याने सुमारे चार किलोमीटरपर्यंत भाविकांना पायी जावे लागत आहे. प्रशासनाने खासगी मिनीबस लावून भाविकांची सोय करावी, अशी मागणी होत आहे.1पुणे जिल्हयात सह्यादी्रच्या कुशीत हिरव्यागार वृक्षांनी वेढलेल्या जंगलात आंबेगाव व खेड तालुक्याच्या हद्दीवर श्रीक्षेत्र भीमाशंकर वसलेले आहे. भीमाशंकरचे मंदिर कोरीव काळ््या दगडामध्ये बाराव्या शतकाच्या मध्यकाळात बांधलेले आहे. या मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची आहे. तसेच भीमाशंकरमधून भीमा नदीचा उगम झाला आहे. भीमाशंकर हे ठिकाण तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटनक्षेत्र म्हणून लोकांना आकर्षित करते.2निसर्गाची मुक्त उधळण या परिसरात पाहावयास मिळते. १३० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले घनदाट सदाहरित हिरवेगार जंगल येथे आहे. या जंगलात शेकरू नावाची मोठी खार आढळते. तसेच जंगली प्राणी, पशु-पक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरे येथे आढळतात. पावसाळ््यात सतत धुक्याने हा परिसर व्यापलेला असतो. भीमाशंकर जंगलातील भोरगिरी या ठिकाणी कोटेश्वरचे मंदिर असून श्रावण महिन्यात येथेही दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात.3हे मंदिर प्राचीन काळातील असून येथे अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. भोरगिरी गावाला लागूनच भोरगड हा किल्ला असून येथे जुन्या काळातील लेण्या आहेत. हा भोरगड व येथील धबधबे पाहण्यासाठी पावसाळ््यात पर्यटक येत असतात. तसेच जंगलातील गुप्तभीमाशंकर या ठिकाणी श्रावण महिन्यात अनेक भाविक दर्शनासाठी जातात. भीमाशंकरमध्ये श्रावण महिन्याबरोबरच महाशिवरात्री, चातुर्मास, त्रिपुरी पौर्णिमा या काळात यात्रा भरते. यातील श्रावण महिन्याची यात्रा पुरातन काळापासून सुरू आहे. पूर्ण एक महिना दर्शनासाठी भाविकांची येथे गर्दी असते.

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक